Harbhajan Singh: ‘माझ्या कारकिर्दीत खूप सारे व्हिलन झाले’, धोनीनंतर भज्जीने साधला बीसीसीआयवर निशाणा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असलेल्या हरभजन सिंगने (Harbhajan Singh) नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

नंतर तो त्याच्या करिअरच्या अनेक घटनांबद्दल बोलता झालाय.नुकतेच त्याने बीसीसीआयच्या (BCCI)अधिकाऱ्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत.

एवढच नाही तर महेंद्रसिंग धोनीबद्दलही (Dhoni) त्यानं नाराजीचा सूर लावलाय. यावेळी हरभजनने सांगितले की, त्याला संघातून का वगळण्यात आले. याचे कारण त्याला सांगण्यात आले नाही.

आता दुसऱ्यांदा हरभजनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. तो म्हणाला की, बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना मी टीम इंडियात परतावे असे त्यावेळी वाटत नव्हते.

तेव्हा धोनी कर्णधार होता आणि त्यानेही अधिकाऱ्यांना साथ दिली. माझा बायोपिक चित्रपट किंवा वेब सिरीज बनवली तर त्यात एक नाही तर अनेक खलनायक असतील असा खोचक टोला देखील त्याने यावेळी लगावला आहे.

मी अजून ४-५ वर्षे खेळण्याचा विचार करत होतो हरभजनने एका मुलाखतीत सांगितले की, नशीब नेहमीच माझ्यासोबत आहे. फक्त काही बाह्य घटक होते, जे माझ्या बाजूने नव्हते.

ते पूर्णपणे माझ्या विरोधात होते असे म्हणता येईल. मी ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होतो आणि चांगली हालचाल करत होतो त्यामुळेच.

मी 31 वर्षांचा होतो तोपर्यंत मी 400 विकेट घेतल्या होत्या. मग पुढची ४-५ वर्षे खेळण्याचा विचार मनात चालू होता. तसं झालं असतं तर मी आणखी शंभर दीडशे विकेट घेतल्या असत्या.

धोनीचा बीसीसीआयला सपोर्ट – भज्जी म्हणाला की, त्यावेळेस महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाचा कप्तान होता. मला असं वाटतं, त्यावेळेस सगळ्या गोष्टी धोनीच्या डोक्यावरुनही जात असाव्यात.

त्यात काही बीसीसीआयचे काही अधिकारी मिळालेले होते. त्यांना असं वाटत होतं की मी पुढे खेळू नये आणि कप्तान म्हणूणही धोनीनं त्यांना सपोर्ट केला.

अर्थातच कप्तान, कोच, किंवा टीम कधीच बीसीसीआयपेक्षा (BCCI) मोठी नसते.असं देखील त्याने यावेळी सांगितलं आहे.

धोनीला जरा जास्तच सपोर्ट – माजी ऑफस्पीनर असलेल्या हरभजनसिंगनं म्हटलं की, इतर क्रिकेटर्सच्या तुलनेत धोनीला (Dhoni) जास्त आणि बीसीसीआयचा चांगला सपोर्ट मिळाला.

असाच सपोर्ट इतर खेळाडूंना मिळाला असता तर त्यानेही बेहतरीन खेळ केला असता. असं नव्हतं की, इतर खेळाडू हे बॉल स्विंग करायला विसरले होते किंवा बॅटींग करणे विसरले होते.

प्रत्येक खेळाडूला वाटतं की, टीम इंडियाची जर्सी घालूनच रिटायर व्हावं. पण असं सगळ्यांसोबत होत नाही. तुम्ही व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, विरेंद्र सहवागसारख्या खेळाडूंना उदाहरण म्हणून बघू शकता.

भज्जीला त्याचा बायोपिकही बनवायचा आहे – हरभजन म्हणाला की, मला माझ्या करिअरवर बायोपिक किंवा वेब सिरीज बनवायची आहे, जेणेकरून लोकांना माझी बाजूही पाहायला मिळेल.

मी माझ्या कारकिर्दीत काय केले आणि इतर लोकांनी माझ्यासाठी काय केले हे देखील तुम्ही पाहू शकाल. माझ्या बायोपिकमध्ये खलनायक कोण असेल हे मी सांगू शकत नाही. या बायोपिकमध्ये एक नाही तर अनेक खलनायक दिसणार आहेत.

टेस्टमध्ये हरभजनचे 417 विकेट – हरभजनसिंग वयाच्या 41 व्या वर्षी संन्यास घेतला. त्यावेळेस ट्विटरवर त्यानं लिहीलं होतं- मी त्या खेळाला बाय बाय करतोय, ज्यानं मला आयुष्यातल्या सर्व गोष्टी दिल्या.

सगळ्या चांगल्या गोष्टी संपत असतात. मी त्या सर्वांना धन्यवाद देतोय ज्यांनी 23 वर्षांचा हा प्रवास ‘बेहतरीन’ आणि ‘यादगार’ केला.

भज्जीनं त्याच्या शानदार करिअरमध्ये 103 मध्ये 417 विकेट, 236 वन डे इंटरनॅशनल मॅचमध्ये 269 विकेट आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 25 विकेट घेतलेल्या आहेत. हरभजनने केलेल्या या खुलास्यानंतर मात्र क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe