ऐन थंडीत पावसाच्या धारा ! पुढील 4 दिवस ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा नवा अंदाज काय सांगतो ?

राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमान कमी झाले असून यामुळे सकाळी-सकाळी गारठा जाणवत आहे. अजूनही थंडीची तीव्रता म्हणावी तशी वाढलेली नाही मात्र येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढणार आहे आणि सर्वत्र शेकोट्या पेटलेल्या आपल्याला दिसतील.

Published on -

Havaman Andaj 2024 : 12 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा पावसाचे सत्र सुरू होणार असा नवा कोरा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून समोर आला आहे. खरे तर, सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील थंडीची चाहूल लागलीये. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमान कमी झाले असून यामुळे सकाळी-सकाळी गारठा जाणवत आहे.

अजूनही थंडीची तीव्रता म्हणावी तशी वाढलेली नाही मात्र येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढणार आहे आणि सर्वत्र शेकोट्या पेटलेल्या आपल्याला दिसतील. या साऱ्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

12 नोव्हेंबर पासून पुढील चार दिवस म्हणजेच 15 नोव्हेंबर पर्यंत देशातील केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची स्थिती तयार होणार आहे. आय एम डी च्या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत येत्या 36 तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे.

याचाच परिणाम म्हणून केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश मध्ये 12 नोव्हेंबर पासून पुढील काही दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल असा अंदाज आहे. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या काही भागांमध्ये 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

या काळात तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र या काळात तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. केरळ आणि माहे येथे 13, 14 आणि 15 नोव्हेंबरला मुसळधार पाऊस कोसळेल असे म्हटले जात आहे.

आंध्र प्रदेशचा किनारी भाग, यनम, रायलसीमामध्ये १२ आणि १३ नोव्हेंबरला मुसळधार पाऊस पडू शकतो अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर सध्या राज्यात थंडीची चाहूल आहे आणि कुठेच पाऊस होत नाहीये.

राज्याचे हवामान गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे कोरडे असून आगामी काही दिवस राज्याचे हवामान असेच कोरडे राहणार आहेत. आता राज्यात थंडीची तीव्रता हळूहळू वाढत जाणार आहे.

यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पेरण्या बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर पेरणीचे नियोजन करून घ्यावे. सध्याची परिस्थिती ही रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी सर्वाधिक पोषक असून ज्यांच्या पेरण्या बाकी असतील त्यांनी लवकर पेरण्या पूर्ण करून घ्याव्यात असा सल्ला कृषी तज्ञांनी दिलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe