Havaman Andaj 2024 : आज आणि उद्या महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार या संदर्भात भारतीय हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये सविस्तर माहिती दिली आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार याबाबत हवामान खात्याने नुकत्याच जारी केलेल्या हवामानाचा अंदाजात सविस्तर डिटेल देण्यात आली आहे.
खरंतर भारतीय हवामान खात्याने सप्टेंबरच्या दीर्घकालीन हवामान अंदाजात याही महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असा अंदाज वर्तवला आहे. या चालू महिन्यात सरासरीच्या 109% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोबतच ला निना आणि सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास सुद्धा लांबण्याची शक्यता आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वर्षी ला निना सक्रीय असतो त्यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबत असतो.
यंदाही ला निना लवकरच सक्रिय होण्याची शक्यता असून यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास आणखी लांबणार असे बोलले जात आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत यंदा जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आता आपण भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहूया.
कुठं बरसणार मुसळधारा?
भारतीय हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे आज संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. काही ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पण आज मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
म्हणजेच मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि सातारा वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्र विभागात पावसाची तीव्रता कमी राहणार आहे. उद्या अर्थातच सात सप्टेंबरला राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील तीन जिल्ह्यांमध्ये अन पुणे, कोल्हापूर, सातारा या मध्य महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या अनुषंगाने या सदरील जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून पिवळा इशारा देण्यात आला आहे.