Havaman Andaj 2024 : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. खरे तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.
यामुळे राज्यात शेतीकामांना चांगला वेग आला आहे. रब्बी हंगामाच्या पिक पेरणीला देखील गती मिळाली आहे. किंबहुना अनेक भागात पिकाची पेरणी पूर्ण झाली असून आता थंडीची चाहूल लागली असल्याने विविध पिकांसाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.

अशातच आता भारतीय हवामान खात्याने पावसा संदर्भात मोठी घोषणा केली आहे. हवामान खात्याच्या तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे कमबॅक होणार आहे. खरंतर आजपासून दीपोत्सवाला अर्थातच दिवाळीला सुरुवात झालीये.
वसुबारसपासून दीपोत्सव सुरू होतो यानुसार यंदाचा दीपोत्सव आजपासून सुरू झालाय. मात्र यंदाच्या दीपोत्सवाच्या काळात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे उद्यापासून अर्थातच 29 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे.
29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस बरसणार अंदाज आहे. या काळात पावसाचा जोर फारसा अधिक राहणार नाही मात्र हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या काळात पाऊस पडणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कुठे पडणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबरला दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर तसेच विदर्भ विभागातील भंडारा-गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
30 ऑक्टोबरला बीड जालना धाराशिव संभाजीनगर या मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये, दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील अहिल्या नगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर, विदर्भातील नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
30 ऑक्टोबरला फक्त विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज असून या सर्व जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.