Havaman Andaj : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटची तीव्रता प्रचंड वाढल्याचे दिसते. ऑक्टोबर हिटमुळे जनता त्रस्त झाली आहे. अशातच, मात्र राज्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर हिटची तीव्रता वाढल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे.
परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने काही भागांमधील उकाडा काहीसा कमी झाला आहे. पावसाळी वातावरणामुळे पुन्हा एकदा राज्यातील हवामान आल्हाददायक बनत आहे. पावसाळी हवामानामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील कमाल तापमानात घट नोंदवली जात आहे.

दरम्यान भारतीय हवामान खात्याने आजही राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटा सह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर आज राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, काल अर्थातच 9 ऑक्टोबरला लक्षद्वीप बेटसमूह आणि लगतच्या अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
महत्त्वाचे म्हणजे आज या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. तसेच उत्तर कोकणापासून कुमारीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. हेच कारण आहे की आज राज्यात पावसाचा जोर वाढणार असं दिसत आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि मध्य महाराष्ट्र विभागातील सातारा, कोल्हापूर या चार जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.या संबंधित जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच आज कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, संपूर्ण खानदेश, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सांगली, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी आणि विदर्भ विभागातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांनाही आज येलो अलर्ट देण्यात आला आहे हे विशेष.