Havaman Andaj : महाराष्ट्रात आणि देशातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता प्रचंड वाढली आहे. राज्यात काही ठिकाणी कमाल आणि किमान तापमान सातत्याने कमी होत आहे आणि यामुळे थंडीचा कडाका वाढतोय.
हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यात अशीच स्थिती राहणार असे म्हटले आहे. राज्यातील काही भागांमध्ये चक्क थंडीची लाट येऊ शकते असा सुद्धा अंदाज काही तज्ञांकडून व्यक्त केला जातोय. दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये तसेच राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणाचा मुद्दा गंभीर होत चालला.

हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत असून यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशी सगळी परिस्थिती असतानाच आता हवामान खात्याकडून देशातील काही राज्यांमध्ये ऐन हिवाळ्यात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज देण्यात आला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की यंदाचा डिसेंबर महिना हा सर्वाधिक थंड राहिला आहे. या महिन्यात अनेक भागात नीचांकी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या डिसेंबर महिन्याने थंडीचे सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
2014 ते 2025 या कालावधी मधील आकडेवारी पाहिली असता यंदाचा डिसेंबर महिना सर्वाधिक थंड असल्याची माहिती काही तज्ञांनी दिली आहे. राज्यातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता अधिक आहे. पुण्यात आणि मुंबईत सुद्धा थंडीची तीव्रता वाढली आहे.
उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान चक्क सहा अंश पर्यंत खाली आले आहे. महत्वाचे बाब म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात देखील अशीच होणार असून जानेवारी महिन्यातही राज्यातील काही भागांमध्ये अशीच थंडीची तीव्रता कायम राहणार असा अंदाज आहे पण देशातील काही राज्यांमध्ये आज पासून तीन दिवस म्हणजेच 24, 25 आणि 26 डिसेंबर रोजी मुसळधार पावसासाठी पोषक स्थिती तयार होताना दिसत आहे.
या भागात पावसासाठी पोषक वातावरण
उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यात निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. निफाड मध्ये देखील तापमान 6 अंशापेक्षा कमी झाले. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित भागात तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 10 अंशाच्या आसपास पाहायाला मिळाला.
मात्र मुंबई आणि पुण्यात वायु प्रदूषण वाढले आहे आणि यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले. परिणामी या मुद्द्यावरून सर्वसामान्यांमध्ये शासनाच्या विरोधात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे आता कडाक्याच्या थंडीत आणि वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येत अवकाळी डोकं वर काढत आहे. देशातील काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. यासोबतच जम्मू-कश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड, लडाख, अंदमान, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे सुद्धा मुसळधार पाऊस हजेरी लावू शकतो असा अंदाज देण्यात आला आहे.