Havaman Andaj : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 2026 हे वर्ष राज्यातील शेतकऱ्यांसाठी काहीसे चिंताजनक राहणार असा अंदाज आहे.
यावर्षी हवामानात मोठा बदल होणार असून मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असे चित्र तयार होत आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी देशाचा दुष्काळ पडला होता तसाच दुष्काळ पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो.

याबाबत देशातील हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी संस्थांनी हवामान खात्यातील तज्ञांनी आणि आता परदेशी हवामान संस्थांनी सुद्धा अंदाज वर्तवला आहे.
सगळ्यात आधी स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने 2026 मध्ये एल लेनोवो मुळे दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान या संदर्भात भारतीय हवामान खात्यातील तज्ञांकडून देखील मोठी माहिती देण्यात आली आहे.
हे वर्षे एल निनोचे राहणार असून या प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मॉन्सून प्रभावित होणार आहे. या स्थितीमुळे यंदा मान्सून काळात कमी पर्जन्यमान राहणार असा अंदाज आहे.
खरंतर मागील वर्ष हे ला निनाचे होते. यामुळे गेल्यावर्षी मान्सून काळात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला. कमी दिवसात जास्त पाऊस पडला. अनेक भागात अतिवृष्टी पाहायला मिळाली.
महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही प्रशांत महासागरात ला – निना सक्रिय आहे. मात्र ही स्थिती लवकरच बदलणार असल्याचे चित्र तयार होत आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा त्यांनी हिवाळ्यातील तापमानाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी त्यांनी एल निनोबाबत सुद्धा माहिती दिली. महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ‘एल निनो’चा प्रभाव असण्याची दाट शक्यता आहे.
एलनिनो म्हणजे अशी स्थिती जेव्हा प्रशांत महासागरातील तापमान सर्वसामान्य पेक्षा अधिक होते. दरम्यान हा एलनिनो नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर परिणाम करतो. यामुळे मान्सूनला मोठा अडथळा येतो.
या स्थितीमुळे आपल्याकडे मान्सून काळात पाऊस सरासरीहून कमी पडेल, अशी शक्यता आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने हा अंदाज आताच वर्तवणे थोडे घाईचे होईल, असे पण सांगितले आहे.
तसेच पुढील तीन महिने म्हणजेच मार्चपर्यंत वायव्य भारतातील बहुतांशी भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. युरोपियन हवामान आणि हवामान विश्लेषण संस्था सिव्हिअर वेदर युरोपने सुद्धा पुन्हा एलनिनो डोकं वर काढणार अशी माहिती दिली आहे.
ह्या संस्थेने सांगितल्याप्रमाणे प्रशांत महासागरात एल निनो परिस्थितीच्या संभाव्य पुनरागमनाची सुरुवातीची चिन्हे दिसू लागली आहेत. आता ही स्थिती या चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत अधिक प्रकर्षाने जाणवेल आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरू होईल आणि उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात शिखरावर पोहोचू शकते. थोडक्यात स्कायमेट, युरोपियन हवामानाचा संस्था आणि भारतीय हवामान संस्था तिघांनी पण एलनिनो येणार असे भाकीत वर्तवलेले आहे.












