Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात वादळी पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार सहित उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये आणि गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरु आहे.
मुसळधार पावसासोबतच वादळी वारे पण वाहत आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील वादळी पावसाचा मुक्काम वाढला असल्याचे वृत्त हवामान खात्याच्या माध्यमातून समोर येत आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील वादळी पावसाचा मुक्काम लांबला अशी माहिती तज्ञांनी दिली आहे. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे आणि यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा चिंतेत सापडलेत.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे वादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या आसपास रेंगाळलेला आहे. हेच कारण आहे की राज्यातील वादळी पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस लांबला आहे.
भारतीय हवामान खात्याने पाच नोव्हेंबर 2025 पर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आता आपण भारतीय हवामान खात्याचा सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत. 5 नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच पुढील एका आठवडा राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या संदर्भातील माहिती आता आपण पाहूयात.
कुठं पडणार पाऊस
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा याच्या एकत्रित परिणामामुळे महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस लांबला आहे. राज्यात आता 5 नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील तसेच हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ‘मोंथा’च्या प्रभावामुळे 27 ते 30 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र-गुजरात किनाऱ्याच्या आसपास स्थिरावलेला राहणार असा अंदाज हवामान खात्यातील वरिष्ठाकडून देण्यात आला आहे. पण हा कमी दाबाचा पट्टा दोन नोव्हेंबरपासून पुढे सरकणार आहे.
तो 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान गुजरातमार्गे राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे. मात्र तोवर राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम तसेच मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात राज्यभर पावसाची हजेरी राहणार अशी शक्यता आहे. पण कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात याचा अधिक प्रभाव पाहायला मिळेल असे तज्ञांनी क्लिअर केले आहे.













