यावर्षी दिवाळीच्या काळातही महाराष्ट्रात पाऊस पडणार का? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे उद्यापासून महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमधून पाऊस रजा घेणार आहे. उद्यापासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे. अर्थातच फक्त आजच्या दिवस राज्यात सर्व दूर पाऊस पडणार असे दिसते. उद्यापासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमधून पाऊस माघार घेणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Havaman Andaj

Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळतोय. गत काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून दिवाळीच्या काळातही यंदा पाऊस राहणार असा सवाल उपस्थित केला जातोय.

दरम्यान भारतीय हवामान खात्याने पावसा संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे उद्यापासून महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमधून पाऊस रजा घेणार आहे. उद्यापासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे.

अर्थातच फक्त आजच्या दिवस राज्यात सर्व दूर पाऊस पडणार असे दिसते. उद्यापासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमधून पाऊस माघार घेणार आहे. पण, महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मात्र या काळात दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये फारच किरकोळ पाऊस पडणार आहे. अर्थातच आता जसा मुसळधार पाऊस सुरू होता तसा पाऊस राहणार नाही.

26 ते 29 ऑक्टोबर या चार दिवसांच्या काळात अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहिला आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस होणार असा अंदाज आहे.

या चार दिवसाच्या काळात राज्यातील जवळपास १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र त्याच्यानंतर पाऊस रजेवर जाण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ यंदा दिवाळीच्या काळात पाऊस पडणार नाही. 29 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातील हवामान कोरडे होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe