SBI पेक्षा एचडीएफसी बँकेची FD योजना ठरणार फायदेशीर ! 18 महिन्यांच्या एफडी मध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार ?

मार्केट कॅपिटलच्या बाबतीत एचडीएफसी ही भारतातील सर्वात मोठी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर अधिकचा परतावा देत आहे. एचडीएफसी बँकेच्या 18 महिन्यांच्या एफडी योजनेत जर गुंतवणूक केली तर सामान्य ग्राहकांना 7.25% या रेटने व्याज दिले जात आहे.

Published on -

HDFC Bank FD News : एसबीआय आणि एचडीएफसी या देशातील दोन मोठ्या बँका. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक तर एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक. या दोन्ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगला परतावा देत आहेत. एचडीएफसी बँकेबाबत बोलायचं झालं तर एचडीएफसी बँकेची 18 महिन्यांची एफडी योजना ही ग्राहकांसाठी अधिक परवडणारी ठरते.

जर तुम्हीही अल्पकालावधीसाठी एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर एचडीएफसी बँकेचे 18 महिन्यांची एफडी योजना तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते.

दरम्यान, आता आपण एचडीएफसी बँकेच्या याच 18 महिन्यांच्या एफडी योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे HDFC बँकेची FD योजना?

मार्केट कॅपिटलच्या बाबतीत एचडीएफसी ही भारतातील सर्वात मोठी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर अधिकचा परतावा देत आहे. एचडीएफसी बँकेच्या 18 महिन्यांच्या एफडी योजनेत जर गुंतवणूक केली तर सामान्य ग्राहकांना 7.25% या रेटने व्याज दिले जात आहे.

जर याच एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 0.50% अधिकच्या रेटने व्याज दिले जात आहे. म्हणजे सीनियर सिटीजन ग्राहकाने 18 महिने कालावधीच्या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.75% या रेटने व्याज दिले जात आहे.

या हिशोबाने जर एखाद्या सामान्य ग्राहकाने एचडीएफसी बँकेच्या 18 महिने कालावधीच्या एफडी योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच लाख 56 हजार 818 मिळणार आहेत.

जर याच एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकाने म्हणजे सिनिअर सिटीजन ग्राहकाने पाच लाख रुपये गुंतवले तर त्यांना पाच लाख 60 हजार 927 रुपये मिळणार आहेत.

म्हणजेच पाच लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटी वर सामान्य ग्राहकांना 56,818 आणि सीनियर सिटीजन ग्राहकांना 60,927 रुपये व्याज म्हणून दिले जाणार आहेत.

नक्कीच ज्या लोकांना कमी वेळेत चांगला परतावा मिळवायचा असेल, गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी एचडीएफसी बँकेचा हा पर्याय चांगला ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe