एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 9 महिन्याच्या FD मध्ये 9 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Published on -

HDFC Bank FD Scheme : एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक. या बँकेची ग्राहक संख्या फारच मोठी आहे. आरबीआयने अलीकडे जाहीर केलेल्या सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत या बँकेचा सुद्धा समावेश होतो. एसबीआय, आयसीआयसीआय या बँकांसमवेतच एचडीएफसी ही देखील देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते.

दरम्यान, प्रायव्हेट सेक्टरमधील ही बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर सुद्धा चांगले व्याज देत आहे. या बँकेकडून एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले जात असून आज आपण बँकेच्या नऊ महिन्यांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

एचडीएफसीच्या नऊ महिन्यांच्या एफडीचे व्याजदर

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक एचडीएफसी आपल्या सामान्य ग्राहकांना नऊ महिन्यांच्या एफडीवर 5.75% व्याजदराने रिटर्न देत आहे. मात्र याच कालावधीच्या एफडीवर सिनिअर सिटीजन ग्राहकांना म्हणजेच ज्या ग्राहकांचे वय 60 वर्षांहून अधिक आहे त्या ग्राहकांना 6.25 टक्के व्याजदराने रिटर्न दिले जात आहे.

अर्थातच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना एचडीएफसी बँकेकडून 0.50% अतिरिक्त व्याज दिले जात असून याच कारणाने एचडीएफसी बँकेची नऊ महिन्यांची एफडी योजना सिनिअर सिटीजन ग्राहकांसाठी अधिक फायद्याची ठरत आहे. आता आपण एचडीएफसीच्या नऊ महिन्याच्या एफडी योजनेत नऊ लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार याच कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.

नऊ लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार

एचडीएफसी बँकेच्या नऊ महिन्यांच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांनी नऊ लाख रुपये इन्वेस्ट केले तर त्यांना 5.75% इंटरेस्ट रेट नुसार मॅच्युरिटीवर म्हणजेच नऊ महिन्यांचा काळ पूर्ण झाल्यानंतर नऊ लाख 39 हजार 556 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 39 हजार 556 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत. मात्र साठ वर्षांवरील नागरिकांना नऊ लाखाच्या गुंतवणुकीतून यापेक्षा अधिकचे पैसे व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.

जर समजा साठ वर्षांवरील नागरिकांनी एचडीएफसी बँकेच्या नऊ महिन्यांच्या एफडी योजनेत नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 6.25 टक्के व्याजदरानुसार मॅच्युरिटीवर नऊ लाख 43 हजार 48 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 43 हजार 48 रुपये संबंधित सीनियर सिटीजन ग्राहकांना व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.

म्हणजेच या योजनेत सामान्य ग्राहकांनी नऊ लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना 40000 पेक्षा कमी रिटर्न मिळतील तर 60 वर्षांवरील नागरिकांना 43 हजार रुपये रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe