एचडीएफसी बँकेकडून 7 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार ? वाचा सविस्तर

एचडीएफसी बँकेकडून 10.85% या इंटरेस्ट रेटवर एखाद्या ग्राहकाला सात लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज पाच वर्ष कालावधीसाठी मंजूर करण्यात आले तर सदर व्यक्तीला 15167 रुपयाचा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे. अर्थातच सदर ग्राहकाला नऊ लाख दहा हजार वीस रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत.

Published on -

HDFC Bank Personal Loan : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. प्रायव्हेट सेक्टर मधील हे बडी बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते.

एचडीएफसी बँकेकडून आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देखील दिले जाते. दरम्यान आज आपण एचडीएफसी च्या वैयक्तिक कर्जाचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर

एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीनुसार बँकेकडून आपल्या ग्राहकांना 10.85% या व्याजदरात वैयक्तिक कर्ज ऑफर केले जात आहे. मात्र हे बँकेचे किमान व्याजदर असून याचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळणार आहे.

ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर हा किमान 800 च्या आसपास असतो अशा ग्राहकांना या व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

बँकेकडून सात लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर

जर समजा एचडीएफसी बँकेकडून 10.85% या इंटरेस्ट रेटवर एखाद्या ग्राहकाला सात लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज पाच वर्ष कालावधीसाठी मंजूर करण्यात आले तर सदर व्यक्तीला 15167 रुपयाचा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे.

अर्थातच सदर ग्राहकाला नऊ लाख दहा हजार वीस रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत. मुद्दल वजा करता जवळपास दोन लाख दहा हजार वीस रुपये बँकेला व्याज म्हणून द्यावे लागणार आहे.

त्यामुळे जर तुम्हालाही एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज काढायचे असेल तर तुम्ही या गोष्टीचा नक्कीच विचार करायला हवा. खरे तर एचडीएफसी बँकेकडून ऑफर होणाऱ्या इतर सर्व कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे अधिक आहेत.

कोणत्याही बँकेचे वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांच्या तुलनेत अधिक असते. यामुळे जेव्हा तुम्हाला फारच इमर्जन्सी असेल तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा पर्याय स्वीकारावा. अन्यथा इतर मार्गांनी पैशांची उपलब्धता करावी असा सल्ला दिला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe