HDFC बँकेच्या 18 महिन्यांच्या FD योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

एचडीएफसीमध्ये फिक्स डिपॉझिट करण्याचा प्लॅन आहे का मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण एचडीएफसीच्या दीड वर्षांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

Published on -

HDFC FD Scheme : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिटवर चांगले व्याजदर ऑफर करत आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयकडून रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली.

आरबीआयने अलीकडेच रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी केलेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआय कडून रेपो रेटमध्ये 0.25 टक्यांची कपात करण्यात आली यानंतर या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी झालेत.

दरम्यान आरबीआय ने हा निर्णय घेतल्यानंतर एसबीआय एचडीएफसीआयसीआयसीआय अशा असंख्य बँकांनी आपल्या एफ डी व्याजदरात सुद्धा कपात केली आहे. यामुळे एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसतोय.

दरम्यान जर तुम्हालाही अशा परिस्थितीत चांगले व्याजदर ऑफर करणाऱ्या बँकेत एफडी करायचे असेल तर तुमच्यासाठी एचडीएफसी चा पर्याय नक्कीच बेस्ट ठरणार आहे.

म्हणूनच आज आपण एचडीएफसी चे 18 महिन्याच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. एचडीएफसीची दीड वर्षांची एफडी योजना ग्राहकांना चांगले व्याजदर ऑफर करत असून आज आपण याच योजनेचे सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

कशी आहे एचडीएफसीची दीड वर्षाची एफडी योजना ?

एचडीएफसी बँकेकडून आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर केली जाते. या बँकेकडून ऑफर केल्या जाणाऱ्या एफडी योजनेत ग्राहकांना किमान तीन टक्क्यांपासून ते कमाल 7.35% पर्यंत चे व्याज मिळत आहे.

दरम्यान, एचडीएफसी बँक 18 महिन्यांच्या FD योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.85% दराने व्याज दिले जात आहे.

मात्र जेष्ठ नागरिक ग्राहकांना 18 महिन्यांच्या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.35% दराने व्याज दिले जात आहे. आता आपण दीड वर्षांच्या एफडी योजनेत दोन लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? याचा आढावा घेणार आहोत.

2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

HDFC ही प्रायव्हेट क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून या बँकेच्या 18 महिन्यांच्या एफडी योजनेत जर सामान्य ग्राहकांनी दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना 6.85% दराने दोन लाख 21 हजार 512 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच सामान्य ग्राहकांना 21 हजार 512 रुपयांचे व्याज मिळणार आहे.

दुसरीकडे, जर याच 18 महिन्यांच्या एफडी योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना दोन लाख 23,154 मिळणार आहेत. म्हणजेच सीनियर सिटीजन ग्राहकांना 23 हजार 154 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News