HDFC बँकेकडून 33 लाखांचे गृह कर्ज घेतल्यास किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ?

एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असून जर तुम्ही गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर एचडीएफसी बँकेचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे कारण की ही बँक आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात होम लोन पुरवत आहे. या बँकेकडून किमान 8.75 टक्के व्याजदराने होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

Published on -

HDFC Home Loan EMI : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक, ही बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज स्वस्त व्याजदरात उपलब्ध करून देते. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात Home Loan पुरवत आहे. खरंतर अलीकडे घराचे स्वप्न पूर्ण करणे फारच अवघड बनले आहे कारण की घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

अशा स्थितीत अनेकजण होम लोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत. दरम्यान जर तुमचाही होम लोन घेण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. कारण की आज आपण एचडीएफसी बँकेच्या होम लोन ची माहिती पाहणार आहोत.

या बँकेचे होम लोन वरील व्याजदर तसेच बँकेकडून तेथेच लाखांचे गृह कर्ज घेतल्यास किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार याचे कॅल्क्युलेशन आज आपण समजून घेणार आहोत.

एचडीएफसी बँकेचे होम लोनवरील व्याजदर

एचडीएफसी बँकेच्या होम लोन वरील व्याजदराबाबत बोलायचं झालं तर ही बँक आपल्या ग्राहकांना 8.75 टक्क्यांपासून ते 9.65 टक्के या स्पेशल व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.

ही बँक आपल्या ग्राहकांना 9.40% ते 9.95% या स्टॅंडर्ड व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देते. दरम्यान या बँकेकडून ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा लोकांना किमान व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

33 लाखांचे Home Loan घेतले तर किती EMI भरावा लागणार ?

एचडीएफसी बँकेकडून जर 8.75 टक्के या किमान व्याजदरात 33 लाखांचे होम लोन 25 वर्षांसाठी मंजूर झाले तर ग्राहकांना 27,131 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.

अशा परिस्थितीत सदर ग्राहकाला 81 लाख 39 हजार 300 रुपये बँकेला भरावे लागणार आहेत. म्हणजेच संबंधित ग्राहकाला 48 लाख 39 हजार तीनशे रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.

जर ग्राहकांना तीस वर्षांसाठी 33 लाखांचे कर्ज मंजूर झाले तर अशा ग्राहकांना 25 हजार 961 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. अशा परिस्थितीत सदर ग्राहकाला 93 लाख 45 हजार 960 रुपये बँकेला भरावे लागणार आहेत. म्हणजेच संबंधित ग्राहकाला 60 लाख 95 हजार 960 रुपये व्याज द्यावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe