HDFC Home Loan : एचडीएफसी ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक. रिझर्व बँकेने एचडीएफसी ला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत सुद्धा ठेवलेले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आरबीआयच्या सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या तीन बँकांचा समावेश आहे.
यामुळे या तिन्ही बँकांकडून गृह कर्ज घेणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान जर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून गृह कर्ज घेण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

कारण की, आज आपण एचडीएफसी बँकेच्या गृह कर्जाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर एखाद्या ग्राहकाला एचडीएफसी बँकेकडून 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे होम लोन हवे असेल तर त्याचा पगार किती असायला हवा ? याबाबतही आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
एचडीएफसी बँकेचे गृह कर्जाचे व्याजदर
एचडीएफसी बँकेबाबत बोलायचं झालं तर ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आपल्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देते. सध्या एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.50% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देते.
मात्र बँकेचा हा किमान व्याजदर आहे याचा फायदा अशाच ग्राहकांना मिळतो ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो.
ज्या लोकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो त्या लोकांना बँकेकडून लवकर कर्ज मंजूर केले जाते तसेच कर्जाचा व्याजदर सुद्धा कमी असतो. खरंतर सिबिल स्कोर हा व्यक्तीच्या क्रेडिट हिस्टरी ची माहिती सांगतो तसेच त्याची कर्ज परतफेड करण्याची क्षमता सुद्धा यातूनच दिसते.
यामुळे बँका कर्ज मंजूर करण्यापूर्वी व्यक्तीचा सिबिल स्कोर चेक करतात आणि ज्या लोकांचा सिबिल खूप चांगला असतो त्यांनाच बँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते.
30 लाखांचे होम लोन हवे असल्यास किती पगार हवा?
एचडीएफसी बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला वीस वर्षांसाठी तीस लाखांचे होम लोन हवे असेल तर तुमचा मासिक पगार हा किमान 53 हजार इतका असायला हवा.
बँकेकडून सांगितल्या गेलेल्या कॅल्क्युलेशन नुसार जर तुमचा महिन्याचा पगार 53 हजार रुपये असेल तर तुम्हाला मॅक्सिमम तीस लाख 53 हजार 617 रुपये इतके होम लोन मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जर एवढे होम लोन तुम्हाला 8.50% व्याजदरात वीस वर्षांसाठी मंजूर झाले तर तुम्हाला 26500 रुपये ईएमआय भरावा लागणार आहे.