SBI चे गृह कर्ज फायदेशीर ठरणार ! 22 लाखांचे होम लोन 10 वर्षांसाठी घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ? वाचा सविस्तर

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 8.50 टक्के या किमान इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशाच लोकांना या व्याजदरात आता गृह कर्ज मिळते. ज्या लोकांचा सिबिल स्कोर कमी असतो त्यांच्याकडून एसबीआयचे गृह कर्जासाठी अधिकचे व्याजदर वसूल करत असते.

Published on -

Home Loan Details : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. यामध्ये होम लोनचा देखील समावेश होतो. खरंतर, अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

घरांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. यामुळे अनेकजण गृह खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारत आहेत.

पण कोणती बँक परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देते हा मोठा सवाल आहे. अशा परिस्थितीत आज आपण एसबीआयचे गृहकर्जाचे व्याजदर समजून घेणार आहोत.

तसेच जर एसबीआय बँकेकडून 22 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज घेतले गेले तर ग्राहकांना किती रुपयांचा हप्ता भरावा लागू शकतो याबाबतही थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

SBI चे गृह कर्ज फायदेशीर ठरणार ! 22 लाखांचे होम लोन 10 वर्षांसाठी घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ? वाचा सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 8.50 टक्के या किमान इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.

मात्र ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशाच लोकांना या व्याजदरात आता गृह कर्ज मिळते. ज्या लोकांचा सिबिल स्कोर कमी असतो त्यांच्याकडून एसबीआयचे गृह कर्जासाठी अधिकचे व्याजदर वसूल करत असते.

जर समजा एखाद्या ग्राहकाला एसबीआयकडून 8.50% या किमान इंटरेस्ट रेटवर 22 लाख रुपयांचे गृह कर्ज दहा वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 27 हजार 277 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

या कॅल्क्युलेशन नुसार सदर ग्राहकाला 32 लाख 73 हजार 240 रुपये बँकेला भरावे लागणार आहेत. अर्थातच व्याज म्हणून दहा लाख 73 हजार 240 रुपये द्यावे लागतील. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रोसेसिंग चार्जेसचा समावेश करण्यात आलेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe