50 लाखाचे घर फक्त 27 लाखात मिळणार ! फक्त Home Loan घेतांना ‘हे’ एक काम करा

तुम्हीही होम लोन घेण्याच्या तयारीत आहात का? मग आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. खरंतर होम लोन हे दीर्घ कालावधीचे कर्ज असते आणि यामुळे होम लोन साठी अधिकचे व्याज द्यावे लागते. मुद्दल कमी आणि व्याज जास्त अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आज आम्ही तुम्हाला असा एक फॉर्मुला सांगणार आहोत ज्यामुळे 50 लाखाचे घर अवघ्या 27 लाखात उपलब्ध होईल.

Updated on -

Home Loan EMI : आपल पण एक छान, टुमदार घर असावं असं स्वप्न कुणाचं नाही. पण नवीन घर खरेदी करणे किंवा घर बांधणे अलीकडे सोप राहिलेल नाही. घरासाठी आता लाखो करोडो रुपयांचा खर्च करावा लागतो आणि यामुळे सर्वसामान्यांना घराच्या स्वप्नांसाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत.

अनेक जण स्वप्नातील घरासाठी होम लोनचा पर्याय स्वीकारतात. होम लोन घेऊन आत्तापर्यंत अनेकांनी आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे मात्र होम लोनमुळे पगारदार लोकांच्या पगाराचा एक मोठा हिस्सा घराचे हप्ते फेडण्यातच निघून जातो.

त्यामुळे होम लोन घेतलेल्या लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. होम लोनमुळे लोकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येते, यामुळे त्यांना आनंद तर मिळतोच पण काही आव्हानांचा सुद्धा सामना करावा लागतो.

होम लोन हे 25 – 30 वर्षांसाठी घेतले जाते आणि यामुळे मुद्दल पेक्षा व्याज जास्त द्यावे लागते. मात्र आज आम्ही तुम्हाला असा एक फॉर्मुला सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घरासाठीचे लाखो रुपये वाचू शकता.

हा फॉर्मुला जर तुम्ही वापरला तर तुम्हाला 50 लाखाचे घर फक्त 27 लाखांमध्ये मिळणार आहे. दरम्यान आता आपण हा फॉर्म्युला जाणून घेण्याआधी पन्नास लाख रुपयांचे घर खरेदी करण्यासाठी किती व्याज भरावे लागू शकते याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. 

50 लाखाच्या घरासाठी किती व्याज? 

जाणकार लोक सांगतात की, जर तुम्ही 50 लाख रुपयांचे घर खरेदी करण्यासाठी वीस वर्षांच्या कालावधीसाठी 40 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले. आणि जर हे कर्ज किमान 8.50% व्याजदराने उपलब्ध झाले तर या प्रकरणात, तुमचा मासिक ईएमआय सुमारे 34,713 रुपये इतका राहणार आहे.

म्हणजेच कर्ज परतफेड करताना सदर तुम्हाला एकूण 83 लाख 31 हजार 103 रुपयांची परतफेड करावी लागणार आहे. यामध्ये चाळीस लाख रुपयांची तुमची मुद्दल रक्कम राहणार आहे आणि उर्वरित 43 लाख 31 हजार 103 रुपये व्याज स्वरूपात तुम्हाला बँकेला द्यावे लागणार आहेत. म्हणजे मुद्दल कमी आणि व्याज जास्त अशीच परिस्थिती राहणार आहे.

50 लाखाचे घर 27 लाखात कस मिळणार?

जाणकार लोक सांगतात की जर तुम्हाला Home Loan साठी व्याज भरावे लागू नये असे वाटत असेल तर तुम्ही एसआयपी सुरू करायला हवे. घराचे पैसे वसूल करायचे असतील, तर म्युच्युअल फंड एसआयपी हा एक उत्तम पर्याय असल्याचा दावा जाणकार लोकांकडून केला जात आहे.

तज्ञ सांगतात की जेव्हा तुम्ही गृह कर्ज घेता म्हणजे गृहकर्जाचा ईएमआय सुरू होतो तेव्हाच तुम्ही एसआयपी मध्ये सुद्धा गुंतवणूक करायला हवी. आता अनेकांच्या माध्यमातून घराची किंमत वसूल करण्यासाठी दरमहा एसआयपीमध्ये किती पैसे गुंतवावेत ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान याबाबत देखील जाणकारांकडून मोठी माहिती देण्यात आली आहे. जाणकार सांगतात की, घराचा पैसा जर वसूल करायचा असेल तर तुम्ही तुमच्या EMI चा सुमारे 20 ते 25 टक्के हिस्सा SIP मध्ये गुंतवायला हवा. आता जर तुम्ही 50 लाखाच्या घरासाठी 40 लाख रुपयांचे होम लोन घेतलेले असेल आणि होम लोनचा तुमचा EMI 34,713 रुपये असेल, तर तुम्ही SIP मध्ये दरमहा सुमारे 8678 रुपये एवढी रक्कम गुंतवायला हवी.

आता समजा तुम्ही 8678 रुपयांची एसआयपी सुरू केली आणि तुम्हाला वार्षिक 12 टक्के दराने रिटर्न मिळालेत तर तुम्हाला वीस वर्षांमध्ये 86 लाख 69 हजार 606 रुपये मिळणार आहेत. यामध्ये तुमची स्वतःची गुंतवणूक ही 20 लाख 82 हजार 480 रुपये एवढी राहील उर्वरित रक्कम ही तुम्हाला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहे.

म्हणजे तुम्ही होम लोन सोबतच एसआयपी सुद्धा सुरू केली तर तुम्हाला तुमच्या घरापेक्षा जास्त पैसा मिळून जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला हे घर फक्त दहा लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला होम लोनच्या हप्त्यासोबतच एसआयपीची रक्कम सुद्धा भरावी लागणार आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!