‘इतका’ पगार असेल तर SBI कडून 50 लाखाचे Home Loan मिळणार ! तुम्हाला मिळणार का एवढं कर्ज ? EMI किती भरावा लागेल ? पहा….

भारतात अनेकजण स्टेट बँक ऑफ इंडिया कडून होम लोन घेण्यास पसंती दाखवतात. एसबीआय ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत येते. ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून बँकेकडून आपल्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

Published on -

Home Loan EMI : अलीकडे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे घर बनवणे सोपे राहिलेले नाही. घरासाठी सर्वसामान्यांना मोठा आटापिटा करावा लागतोय. संपूर्ण आयुष्यभर जमवलेला पैसा सर्वसामान्यांना खर्च करावा लागतोय. महत्त्वाचे म्हणजे इतका सारा आटापिटा करूनही सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन घ्यावे लागते.

दरम्यान जर तुम्हीही तुमच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन देण्याचे तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फारच खास ठरणार आहे. आज आपण एसबीआय कडून 50 लाखांचे होम लोन हवे असल्यास किती पगार असायला हवा? याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असून, ती ग्राहकांना विविध प्रकारची गृहनिर्माण कर्जे देते. पण देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेकडून जर तुम्हाला ५० लाखांचे होम लोन घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुमचा पगार किती असावा लागेल ?

एसबीआयने घेतला मोठा निर्णय!

स्टेट बँक ऑफ इंडिया ने नुकत्याच काही दिवसांपूर्वी होम लोन वरील व्याजदरात 25 बेसिस पॉइंट ने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआयने रेपो दरात कपात केली होती आणि त्यानंतर एसबीआय ने देखील होम लोन वरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे.

या व्याजदरातील कपातीनंतर आता एसबीआय कडून 8.25 टक्के या किमान व्याजदरात आपल्या ग्राहकांना होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

50 लाखांच्या कर्जासाठी मासिक पगार किती हवा?

अनेकांच्या माध्यमातून 50 लाखांच्या होम लोन साठी मासिक पगार किती हवा असा प्रश्न विचारला जात होता. खरेतर यासाठी बँका एक विशिष्ट फार्मूला चा वापर करतात. होम लोनसाठी बँका उमेदवाराच्या EMI-to-Income Ratio चा विचार करतात.

साधारणतः बँक तुमच्या पगाराच्या 50-60% पर्यंत EMI मंजूर करू शकते. उदाहरणार्थ, जर SBI कडून तुम्ही 50 लाखांचे लोन 8.25% व्याजदराने 30 वर्षांसाठी घेतले, तर 37,563 रुपयांचा EMI द्यावा लागणार आहे.

त्यामुळे, हा EMI परवडण्यासाठी तुमचा मासिक पगार किमान 76 हजार रुपये आवश्यक आहे. मात्र लक्षात ठेवा तुमच्यावर आधीपासून कोणतेचं कर्ज नसावे. जर तुम्ही एखाद्या बँकेकडून आधीच कर्ज घेतलेले असेल तर तुम्हाला बँकेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज दिले जाणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News