Home Loan : 30 हजार, 50 हजार अन 60 हजार मासिक पगार असणाऱ्या नोकरदारांना बँकेकडून किती होम लोन मिळणार ?

Published on -

Home Loan : तुम्ही जर घर खरेदी करण्याच्या तयारीत असाल आणि यासाठी शोधाशोध सुरू असेल तर मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. यामुळे आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. खरे तर, अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

यामुळे स्वप्नातील घरांसाठी सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात झगडावे लागते. आपल्या आयुष्यात कमावलेली सर्व संपत्ती केवळ घर बनवण्यासाठी खर्च करावी लागते. घर खरेदी करण्यासाठी अनेकजण तर होम लोनचा पर्याय स्वीकारतात आणि जर तुम्हीही होम लोन घेऊन घर घेण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

तुमच्या पगारानुसार बँकेकडून तुम्हाला किती रुपयांचे होम लोन मंजूर होऊ शकते? याचाच आज आपण आढावा घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

30,000 पगार असल्यास बँकेकडून किती होम लोन मिळणार?

ज्या लोकांचा मासिक पगार 30 हजार रुपये आहे अशा लोकांना बँकेकडून कमाल म्हणजे जास्तीत जास्त 19 लाख वीस हजार 333 रुपयांचे होम लोन मंजूर होऊ शकते. जर समजा हे कर्ज 8.15 टक्के व्याजदरात आणि वीस वर्षांसाठी मंजूर झाले तर सदर व्यक्तीला 16,363 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

50 हजार पगार असल्यास बँकेकडून किती होम लोन मिळणार?

ज्या लोकांचा महिन्याचा पगार 50 हजार रुपये आहे अशा लोकांना बँकेकडून जास्तीत जास्त 37 लाख 18 हजार 904 इतके होम लोन मिळणार आहे. जर समजा एखाद्या ग्राहकाला इतके कर्ज 8.15% व्याजदरात आणि वीस वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर संबंधित व्यक्तीला 31 हजार 687 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

60,000 रुपये पगार असल्यास बँकेकडून किती होम लोन मिळणार?

जर तुमचा महिन्याचा पगार 60 हजार रुपये असेल तर तुम्हाला बँकेकडून जास्तीत जास्त 44 लाख 5 हजार 470 रुपये इतके होम लोन मिळू शकते. जर तुम्हाला हे कर्ज किमान 8.15 टक्के व्याजदर राहत आणि वीस वर्षे कालावधीसाठी मंजूर झाले तर अशावेळी तुम्हाला 37537 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News