Home Loan News : आपलेही एक स्वतःचे घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिले असेल. मात्र प्रत्येकच व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. कारण म्हणजे घराच्या वाढलेल्या किमती. अलीकडे घरांच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत की घर निर्मितीचे स्वप्न साध्य करायचे असेल तर होम लोन शिवाय पर्याय राहत नाही.
दरम्यान जर तुम्हालाही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी होम लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण बँक ऑफ बडोदा चव्हाण लोन ची माहिती पाहणार आहोत. खरे तर देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

यामध्ये बँक ऑफ बडोदा चा सुद्धा समावेश होतो. बँक ऑफ बडोदा कडून आपल्या ग्राहकांना किमान व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात असून आज आपण याच होम लोन बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच बँक ऑफ बडोदा कडून 40 लाख रुपयांचे होम लोन घेतल्यास ग्राहकांना किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार याचे कॅल्क्युलेशन सुद्धा आज आपण या आर्टिकल मधून पाहणार आहोत.
कसे आहे बँक ऑफ बडोदाचे होम लोन
मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.40% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. मात्र हा बँकेचा किमान व्याजदर असून याचा सर्वच ग्राहकांना फायदा मिळत नाही. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर किमान 800 च्या आसपास असतो अशाच ग्राहकांना या व्याजदराचा फायदा मिळतो.
सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. सिबिल स्कोर वरून व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता समजते. यामुळे सर्वच बँका कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करण्याआधी त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चेक करत असतात.
जाणकार लोक असे सांगतात की, ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा साडेसातशे पेक्षा अधिक आहे अशा लोकांना बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मंजूर होऊ शकते तसेच अशा लोकांना लवकरात लवकर कर्ज मंजूर केले जाते. अशा लोकांना मंजूर होणारी कर्जाची रक्कम सुद्धा अधिक असते.
चाळीस लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?
समजा, बँक ऑफ बडोदा कडून तुम्हाला 25 वर्ष कालावधीसाठी चाळीस लाख रुपयांचे होम लोन 8.40% व्याजदरात मंजूर झाले तर अशा प्रकरणात संबंधित ग्राहकाला 31 हजार 940 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. म्हणजेच या कालावधीत संबंधित ग्राहकाला 95 लाख 81 हजार 992 रुपये बँकेकडे जमा करावे लागणार आहेत यामध्ये 55 लाख 81 हजार 992 रुपये हे व्याज राहणार आहे.