Home Loan घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर बँक कर्जाची रक्कम कोणाकडून वसूल करते ? काय सांगतात RBI चे नियम ?

एखाद्या व्यक्तीने गृह कर्ज घेतलेले असेल अन जर कर्ज घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर बँक कर्ज माफ करते, असा अनेकांचा समज आहे. मात्र, हा खोटा समज आहे. कारण की कर्जदार व्यक्तीच्या मृत्यूनंतरही बँक कर्ज वसूल करते. याबाबत आरबीआयने काही नियम तयार केलेले आहेत.

Tejas B Shelar
Published:
Home Loan

Home Loan : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत अन यामुळे अनेक जण स्वप्नातील घरनिर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारतात. दरम्यान, जर तुम्हीही भविष्यात गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

कारण की, आज आपण गृहकर्जाबाबतचे काही नियम थोडक्यात समजून घेणार आहोत. जर गृह कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अशा प्रकरणांमध्ये सदर मयत कर्जदार व्यक्तीच्या कर्जाची रक्कम बँक कोणाकडून वसूल करणार ? याच बाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.

याबाबतचे आरबीआयचे नियम नेमके काय आहेत याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊयात जेणेकरून कर्जदार व्यक्तींना आरबीआयच्या नियमाची माहिती होऊ शकेल.

RBI चे नियम काय सांगतात ?

जर एखाद्या व्यक्तीने गृह कर्ज घेतलेले असेल अन जर कर्ज घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर बँक कर्ज माफ करते, असा अनेकांचा समज आहे. मात्र, हा खोटा समज आहे. कारण की कर्जदार व्यक्तीच्या मृत्यूनंतरही बँक कर्ज वसूल करते.

याबाबत आरबीआयने काही नियम तयार केलेले आहेत. आता आपण व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नावाने घेण्यात आलेल्या गृहकर्जाचे पैसे बँक कोणाकडून वसूल करते ते सविस्तर जाणून घेऊयात.

गृहकर्जाच्या बाबतीत कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, बँक प्रथम सह-कर्जदाराशी संपर्क साधते. त्याला थकीत कर्जाची परतफेड करण्यास सांगते. जर कोणीही सह-कर्जदार उपस्थित नसेल, तर बँक कर्जाच्या जामीनदाराकडे किंवा परतफेडीसाठी कायदेशीर वारसाकडे वळते.

जर व्यक्तीने कर्जाचा विमा उतरवला असेल तर बँक विमा कंपनीला कर्ज भरण्यास सांगते. हे सर्व पर्याय उपलब्ध नसल्यास, बँक थकित कर्ज वसूल करण्यासाठी मालमत्तेचा लिलाव करण्याचा पर्याय निवडते.

अर्थातच गृह कर्ज घेतलेले असेल आणि सदर व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या मयत व्यक्तीच्या गृह कर्जाची जबाबदारी ही सह कर्जदार किंवा जामीनदार किंवा मग कायदेशीर वारस यांची असते. जर या लोकांनी कर्ज फेडण्यास असमर्थता दाखवली तर अशा प्रकरणांमध्ये बँक मालमत्तेचा लिलाव करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe