Home Loan In Just 2 Minute : शिक्षण झाले की नोकरी आणि मनपसंत नोकरी मिळाली की मनपसंत लोकेशनवर स्वतःचे हक्काचे घर ! असे स्वप्न आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असेल. काही लोकांचे हे स्वप्न पूर्ण झाले असेल तर काही लोक अजूनही या स्वप्नांसाठी दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करत असतील. पण आजच्या या महागाईच्या काळात घराचे स्वप्न सहजासहजी पूर्ण होणे जवळपास अशक्य आहे.
घराच्या स्वप्नांसाठी प्रत्येकालाच मेहनत घ्यावी लागते. वेळप्रसंगी कर्जही काढावे लागते. दरम्यान जर तुम्हालाही तुमच्या हक्काच्या घराच्या स्वप्नासाठी होम लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक बँक खास ऑफर घेऊन आली आहे. कोटक महिंद्रा बँक तुम्हाला फक्त दोन मिनिटात होम लोन मंजूर करून देणार आहे.

म्हणजेच जेवढा वेळ मॅगी बनवायला लागतो तेवढ्या वेळात तुम्हाला गृह कर्ज मिळणार आहे. कोटक महिंद्रा बँक दोन मिनिटात आठ लाख रुपयांचे गृह कर्ज सहा वर्षांसाठी मंजूर करून देत आहे.
त्यामुळे जर तुम्हालाही ताबडतोब गृह कर्ज हवे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी कोटक महिंद्रा बँकेकडून इन्स्टंट होम लोन घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ? याची संपूर्ण प्रक्रिया काय असते ? यासाठी कोण पात्र राहत, बँकेचे होम लोन साठीचे व्याजदर कसे आहेत? याच साऱ्या मुद्द्यांची माहिती घेऊन आलो आहोत.
कसे मिळणार दोन मिनिटात होम लोन?
कोटक महिंद्रा बँक असा दावा करते की बँकेकडून पात्र ग्राहकांना फक्त दोन मिनिटात होम लोन दिले जाते. त्यामुळे जर तुम्हाला ही कोटक महिंद्रा बँकेकडून होम लोन घ्यायचे असेल तर तुम्ही कोटक महिंद्रा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.
यासाठी तुम्हाला वेबसाईटच्या पहिला पेजवर जाऊन गृह कर्ज विभागातील “Apply Now” वर क्लिक करायचे आहे. मग आपली वैयक्तिक माहिती भरा जसे की नाव, मोबाइल नंबर, उत्पन्नाचा पुरावा इत्यादी. यानंतर मग आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यानंतर, बँक 2 मिनिटांत पुढील प्रक्रिया पूर्ण करेल. मात्र आपली पात्रता आणि कागदपत्रे तपासल्यानंतरचं कर्ज मंजूर केले जाईल.
Home Loan चे व्याजदर
कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना 8.75% इंटरेस्ट रेटवर होम लोन उपलब्ध करून देत आहे. मात्र बँकेचा हा किमान व्याजदर आहे. याचा फायदा फक्त चांगला सिबिल स्कोर असणाऱ्या लोकांनाच मिळणार आहे. दरम्यान जर तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेकडून आठ लाख रुपयांचे कर्ज सहा वर्षांसाठी 8.75 टक्के व्याजदरात मंजूर झाले तर तुम्हाला 14,222 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
होम लोन साठीच्या पात्रता
किमान 21 वर्षे आणि कमाल 65 वर्षे वय असणाऱ्या ग्राहकांना कोटक महिंद्रा बँकेकडून होम लोन दिले जात आहे. जॉब / बिझिनेस-रोजगार, व्यापारी किंवा स्वयं-एम्प्लॉईड लोकांना बँकेकडून गृह कर्ज दिले जाते. किमान 25 हजार रुपये पगार असणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून कर्ज दिले जाते. तुम्हाला या बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोर 700 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
कोण-कोणती कागदपत्रे लागतात?
ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार आयडी / पासपोर्ट लागते. पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड / विजेचे बिल / टेलिफोन बिल / पासपोर्ट लागते. उत्पन्नाचा पुरावा म्हणून पगार स्लिप ( नोकरी असल्यास), बँक स्टेटमेंट (गेल्या 6 महिन्याचे), आयटीआर रिटर्न (स्वयंरोजगार केलेल्या लोकांसाठी) लागेल. मालमत्ता कागदपत्रे म्हणून सेल करार, घराचा नकाशा इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.