Home Loan Interest Rate : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल नाही का? काही लोकांचे हे स्वप्न आधीच पूर्ण झाले असेल तर काही लोक अजूनही या स्वप्नांसाठी झगडत असतील. दरम्यान जर तुमचंही असंच स्वप्न असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आहे.
खरेतर, आजच्या काळात, वाढती महागाई आणि गगनाला भिडणार्या मालमत्तेच्या किंमतींमुळे सामान्य माणसासाठी घर विकत घेण्याचे स्वप्न अधिक कठीण झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर हवे आहे, परंतु कमी बजेटमुळे हे स्वप्न अपूर्ण राहते.

अशा परिस्थितीत, गृह कर्ज हा एक पर्याय म्हणून पुढे येतो. दरम्यान, जर तुम्हीही गृह कर्ज घेऊन तुमच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील अशा टॉप 4 बँकाची माहिती सांगणार आहोत, जिथून तुम्ही कर्ज घेतल्यास तुम्हाला कमी एमआय भरावा लागणार आहे.
खरंतर, अलीकडे देशातील विविध बँकांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. पण, सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या ? याचा आढावा आता आपण घेऊयात.
या बँका सर्वात स्वस्त गृह कर्ज देतायेत
जर आपण स्वस्त होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांचा पर्याय बेस्ट राहणार आहे. खरे तर होम लोन घेत असाल तर तुम्ही कमी व्याजदरात होम लोन देणाऱ्या बँकांची निवड करायला हवी.
अन सध्या युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र सर्वात कमी व्याज दराने गृह कर्ज देत आहेत. या दोन्ही बँकांमध्ये गृह कर्जाचे व्याज दर 8.10%पासून सुरू होतात, जे इतर बँकांपेक्षा खूपच कमी आहे.
बँक ऑफ बडोदा आणि पीएनबी देखील सर्वोत्तम पर्याय
जर तुम्हाला बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज घ्यायचं नसेल अन तुम्ही इतर पर्याय शोधत असाल तर बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) देखील चांगले पर्याय ठरणार आहेत.
या बँकांमध्ये गृह कर्जाचे व्याजदर 8.15% पासून सुरू होतात. जर आपण या बँकांकडून कर्ज घेतले तर आपण कमी व्याजदराने पैसे मिळवू शकता अन तुमच्या घराचे स्वप्न साकार करू शकता.