Home Loan News : गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल. पण घरांच्या वाढलेल्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन चा पर्याय स्वीकारतांना दिसत आहे.
विशेष म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील घर खरेदीसाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारणे वाईट नसल्याचे म्हणतात. आधी कर्ज घेणे वाईट मानले जात असे. पण घरांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने कर्ज घेऊन घर घेणे सुद्धा वाईट नाहीये.
अशा परिस्थितीत जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात घरासाठी गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण कमी व्याज दरावर गृहकर्ज ऑफर करणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेणार आहोत.
या बँका स्वस्तात गृह कर्ज देतात
स्टेट बँक ऑफ इंडिया : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही आघाडीची बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देते.
SBI सध्या होम लोन अतिशय कमी दरामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देते. बँकेकडून कार लोन देखील अगदीच किफायतशीर दरात दिले जात आहे. यासाठी सध्या SBI कोणतेही प्रोसेसिंग फी आकारत नाहीये.
बँक ऑफ महाराष्ट्र : बँक ऑफ महाराष्ट्र ही देखील देशातील एक मोठी सरकारी बँक आहे. बँक ऑफ महाराष्ट्र देखील एसबीआय प्रमाणेच परवडणाऱ्या व्याजदरावर होम लोन देते.
ही बँक 8.35 टक्के व्याज दरानं आणि ते देखील कोणतीही प्रोसेसिंग फी न आकारता उपलब्ध करून देत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र कार लोन सुद्धा 8.70 टक्के व्याज दरानं देत आहे.
बँक ऑफ बडोदा : परवडणाऱ्या व्याज दरात होम लोन ऑफर करणाऱ्या बँकांच्या यादीत बँक ऑफ बडोदा चा देखील समावेश होतो. बँक ऑफ बडोदा ग्राहकांना 8.40 टक्के व्याज दरानं होम लोन उपलब्ध करून देत आहे.
ही बँक देखील झिरो प्रोसेसिंग फी सोबत होम लोन देत आहे. तसेच बँकेकडून कार लोन 8.95 टक्के व्याज दरानं दिलं जात आहे. पर्सनलं लोन सुद्धा 10.80 टक्के व्याज दराने दिले जात आहे.