Home Loan News : तुम्हीही नजीकच्या भविष्यात गृह कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का ? अहो, मग आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. खरेतर, अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरांमध्ये घर खरेदी करणे म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अशी गत झाली आहे.
त्यामुळे अनेक जण घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकांचा आधार घेतात. गृह कर्ज घेऊन घर खरेदीचे स्वप्न पूर्ण केले जाते. पण, कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था तुमचे मासिक उत्पन्न आणि कर्ज फेडण्याची क्षमता तपासल्यानंतरच तुम्हाला गृहकर्ज देण्याचा विचार करते.

अशा परिस्थितीत, अनेकांच्या माध्यमातून चाळीस लाख रुपयांचे होम लोन मिळवायचे असेल तर किमान किती पगार असायला हवा असा प्रश्न उपस्थित केला जातो. दरम्यान, आज आपण याच बाबत माहिती पाहणार आहोत.
40 लाखाचे होम लोन हवे असेल तर पगार किती असायला हवा?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या प्रोफाइलसोबत, वय देखील महत्त्वाचे आहे जे कर्जाचा कालावधी ठरवत असते.
तसेच, जर आधीपासूनच एखाद्यावर कर्जाचे ओझे असेल तर गृह कर्ज देताना याचाही विचार केला जातो. एचडीएफसी बँकेच्या कॅल्क्युलेटर नुसार 70 हजार 700 रुपये पगार असणाऱ्या लोकांना चाळीस लाख 178 रुपयांचे गृह कर्ज मंजूर होऊ शकते.
जर समजा तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून 8.75 टक्के दराने चाळीस लाख रुपयांचे गृह कर्ज वीस वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर 35 हजार 350 रुपये एवढा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
अर्थातच या कालावधीत सदर ग्राहकाला 84 लाख 84 हजार रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच सदर कर्जदार व्यक्तीला 44 लाख 84 हजार रुपयांचे व्याज द्यावे लागणार आहे.