Home Loan News : तुम्हालाही तुमचे स्वप्नाचे घर बनवायच आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. खरे तर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना गृह कर्जाचा सहारा घ्यावा लागतो.
आपल्यापैकी अनेकांनी गृह कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण केले आहे, तर काहीजण आगामी काळात आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करणार आहेत. अलीकडील काही वर्षांमध्ये गृह कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
बँका देखील आता सर्वसामान्य नागरिकांना कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. खाजगी असो की सरकारी सर्वच बँका आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील बँक देखील आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.
एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक. दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेच्या होम लोन ची माहिती जाणून घेणार आहोत. एचडीएफसी कडून 60 लाखांचे होम लोन मिळवायचे असेल तर किती पगार हवा याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.
HDFC कडून 60 लाखाचे होम लोन हव असल्यास किती पगार पाहिजे ?
जर तुम्हालाही होम लोन घ्यायचे असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचे स्त्रोत असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे इनकम सोर्स असतील तेव्हाच तुम्हाला होम लोन मिळणार आहे. तुमच्या मासिक उत्पन्नाच्या आधारावर बॅंका तुम्हाला होम लोन पुरवतात.
तुम्हाला जास्तीत जास्त किती होम लोन मिळू शकते हे सुद्धा तुमचे मासिक उत्पन्न अन तुमच्या सिबिल स्कोर वर ठरत असतं. गृहकर्जावरील व्याजदर देखील तुमच्या मासिक उत्पन्नावर आणि सिबिल स्कोर वर ठरतो.
सध्या एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.75 टक्के दराने गृह कर्ज ऑफर करत आहे. एचडीएफसी बँकेच्या एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर नुसार जर तुम्हाला वीस वर्षांसाठी 60 लाख रुपयांचे गृह कर्ज हवे असेल तर तुमची मंथली सॅलरी ही एक लाख रुपये असणे आवश्यक आहे.
म्हणजेच एक लाखाच्या आसपास सॅलरी असणाऱ्या लोकांना एचडीएफसी कडून वीस वर्षांसाठी 60 लाखांचे गृह कर्ज मिळू शकते. जर तुमची मंथली सॅलरी एक लाख पाचशे रुपये एवढी आहे तर तुम्हाला बँकेकडून वीस वर्षांसाठी 62 लाख 54 हजार 875 रुपये मिळणार आहेत.
जर तुम्हाला हे कर्ज 8.75 टक्के दराने मिळाले तर तुम्हाला या कर्जासाठी दरमहा 55 हजार 275 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. मात्र सुरुवाती व्याजदराचा फायदा, म्हणजेच किमान 8.75% व्याजदराने फक्त अशाच लोकांना गृह कर्ज मिळेल ज्यांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास आहे.