Home Loan घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आता इतका पगार असेल तरी एसबीआय कडून मिळणार 40 लाखांचे गृह कर्ज

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक म्हणूनही ओळखले जाते. आरबीआय ने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेच्या यादीत ठेवले असून यामुळे अनेकजण या बँकेकडून होम लोन घेण्याचा प्रयत्न करत असतात. 

Published on -

Home Loan : तुम्हालाही तुमच्या स्वप्नाच्या घरासाठी गृह कर्ज घ्यायच आहे का ? मग तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचा पर्याय परफेक्ट राहणार आहे. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

होम लोन, कार लोन, गोल्ड लोन, पर्सनल लोन समवेत विविध प्रकारचे कर्ज एसबीआय कडून उपलब्ध करून दिले जात असून बँकेकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात कर्जाची उपलब्धता करून दिली जात असल्याने अनेकजण या बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करतात.

दरम्यान, आज आपण एसबीआयच्या होम लोन ची माहिती जाणून घेणार आहोत. एसबीआय कडून 40 लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर मासिक पगार किती असायला हवा? तसेच एसबीआयचे होम लोनसाठीचे सध्याचे व्याजदर याची आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

एसबीआयचे होम लोनचे व्याजदर कसे आहे ?

एसबीआय आपल्या ग्राहकांना सध्या स्थितीला किमान 8% व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र, हा बँकेचा किमान व्याजदर असून याचा फायदा फक्त आणि फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच मिळतो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो.

सिबिल स्कोर वरून व्यक्तीच्या कर्ज परतफेडीची क्षमता आणि क्रेडिट हिस्टरी बाबत माहिती मिळते. यामुळे कोणतीही बँक कर्ज मंजूर करण्याआधी त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चेक करतात. सिबिल स्कोर चांगला असेल तर बँकेकडून लवकरात लवकर कर्ज मंजूर केले जाते तसेच कर्जासाठी आकारला जाणारा व्याजदर सुद्धा कमी राहतो.

इतका पगार असेल तर मिळणार 40 लाखांचे होम लोन

एसबीआय कडून 30 वर्षांसाठी जर 40 लाख रुपयांचे होम लोन घ्यायचे असेल तर मासिक पगार किती असायला हवा? मिळालेल्या माहितीनुसार ज्या लोकांचा मासिक पगार 59 हजार रुपये इतका असतो त्यांना बँकेकडून चाळीस लाख रुपयांचे कर्ज मंजूर होते.

मात्र यासाठी संबंधित ग्राहकावर आधीपासूनच कोणत्याही प्रकारच्या कर्जाची थकबाकी नसावी. जर आधीच तुमच्यावर एखाद्या बँकेचे कर्ज असेल तर तुम्हाला 59 हजार रुपये पगार असताना सुद्धा चाळीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होऊ शकत नाही.

दरम्यान, जर एखाद्या ग्राहकाला एसबीआय बँकेकडून तीस वर्ष कालावधीसाठी आणि आठ टक्के इंटरेस्ट रेटने 40 लाख रुपयांचे होम लोन मंजूर झाले तर संबंधित ग्राहकाला 29 हजार पाचशे रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News