Home Loan घेण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ सरकारी बँकांचा पर्याय तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ! वाचा….

तुमचा होम लोन घेण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या तीन सरकारी बँकांची आज आपण माहिती पाहणार आहोत. युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तीन बँकांच्या होम लोनची माहिती आज आपण घेणार आहोत.

Published on -

Home Loan : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यामुळे होम लोन घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान जर तुम्हीही स्वप्नातील घराच्या निर्मितीसाठी गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी विशेष फायद्याची ठरणार आहे.

कारण की आज आपण सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या टॉप 3 सरकारी बँकांची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तिन्ही बँकांचे गृह कर्जाचे व्याजदर जाणून घेणार आहोत.

टॉप 3 बँकांचे Home Loan चे व्याजदर

बँक ऑफ महाराष्ट्र : बँक ऑफ महाराष्ट्र ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या व्याजदराने गृहकर्ज देत आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल म्हणजेच 750 ते 800 च्या आसपास असेल तर तुम्हाला या बँकेकडून 8.10 टक्के व्याजदराने गृहकर्ज मिळणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र कडून जर 8.10% दराने 20 वर्षांसाठी तीस लाख रुपयांचे कर्ज घेतल तर तुम्हाला दरमहा 25,280 रुपये EMI म्हणून द्यावे लागतील.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ महाराष्ट्र प्रमाणेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही सुद्धा देशातील एक महत्त्वाची सरकारी बँक असून या बँकेच्या माध्यमातूनही आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमीत कमी व्याज दरात गृह कर्जाचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो.

या बँकेच्या गृहकर्जबाबत बोलायचं झालं तर ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो म्हणजेच 800 च्या आसपास असतो त्या लोकांना या बँकेकडून बँक ऑफ महाराष्ट्र प्रमाणेच 8.10% व्याजदराने गृह कर्ज दिले जाते. जर 8.10% दराने सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून आपण 20 वर्षांसाठी तीस लाख रुपयांचे कर्ज घेतल तर तुम्हाला दरमहा 25,280 रुपये EMI म्हणून द्यावे लागतील.

युनियन बँक ऑफ इंडिया : युनियन बँक ऑफ इंडिया देखील देशातील एक महत्त्वाची सरकारी बँक असून या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना कमीत कमी व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

ही बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना किमान 8.10 टक्क्यांपासून गृह कर्ज देते. जर 8.10% दराने युनियन बँक ऑफ इंडियाकडून आपण 20 वर्षांसाठी तीस लाख रुपयांचे कर्ज घेतल तर तुम्हाला दरमहा 25,280 रुपये EMI म्हणून द्यावे लागतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News