35 लाखांचे होम लोन हवे आहे ? जाणून घ्या SBI च्या नियमांनुसार तुमचा मासिक पगार किती असावा !

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक असून ती गृहकर्जासाठी अनेक फायदेशीर योजना देते. एसबीआयकडून कमीत कमी व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात असून यामुळे अनेकजण एसबीआय कडून गृह कर्ज घेतात.

Published on -

Home Loan : घर खरेदी करण्याचे स्वप्न प्रत्येकाच्या मनात असते, आणि त्यासाठी बँकेकडून गृहकर्ज घेणे ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक असून ती गृहकर्जासाठी अनेक फायदेशीर योजना देते.

एसबीआयकडून कमीत कमी व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात असून यामुळे अनेकजण एसबीआय कडून गृह कर्ज घेतात. पण, जर तुम्हाला 35 लाख रुपयांचे होम लोन घ्यायचे असेल, तर तुमचा मासिक पगार किती असायला हवा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

SBI च्या नियमांनुसार मासिक पगार किती असावा?

SBI किंवा इतर कोणतीही बँक गृहकर्ज मंजूर करताना अर्जदाराच्या उत्पन्नावर , कर्ज परतफेडीची क्षमता आणि CIBIL स्कोअर यांचा विचार करते. साधारणतः, बँका तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 40 ते 50 टक्के रक्कम ईएमआयसाठी ग्राह्य धरतात.

35 लाखांच्या होम लोनसाठी गणना:

जर समजा एसबीआय कडून तुम्हाला 35 लाख रुपयांचे गृह कर्ज मंजूर झाले, व्याजदर साधारणतः 8.5% गृहित धरल्यास अन कर्जाचा कालावधी 20 वर्षे पकडल्यास सुमारे ₹30,000 ते ₹32,000 रुपये महिना ईएमआय भरावा लागतो. आता जर EMI ₹30,000 – ₹32,000 असेल आणि बँक तुमच्या पगाराच्या 40% भाग ईएमआयसाठी ग्राह्य धरत असेल, तर तुमचा मासिक पगार किमान ₹75,000 ते ₹80,000 असायला हवा.

आता आपण 35 लाखांचे कर्ज मंजूर झाल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार याचे गणित समजून घेऊयात?

जर समजा एखाद्या ग्राहकाला वीस वर्षांसाठी 35 लाखाचे गृह कर्ज 8.50% दराने मंजूर झाले तर सदर ग्राहकाला तीस हजार 374 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच संबंधित ग्राहकाला 37 लाख 89 हजार 715 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत. म्हणजेच संबंधित ग्राहकाला टोटल 72 लाख 89 हजार 715 रुपये भरावे लागतील यामध्ये मुद्दल 35 लाख रुपयांचा समावेश असेल.

होम लोन मिळवण्यासाठी कोणते निकष महत्त्वाचे असतात ?

CIBIL स्कोअर: 750 किंवा त्याहून अधिक असल्यास गृहकर्ज मंजुरीची शक्यता वाढते.
स्थिर उत्पन्न: खासगी किंवा सरकारी कर्मचारी, व्यवसायिक, किंवा स्व-रोजगार असलेल्या व्यक्तींचे उत्पन्न खात्रीशीर असणे आवश्यक.
कर्ज परतफेडीचा इतिहास: आधीचे कर्ज वेळेवर फेडले असल्यास लोन मंजुरी सोपी होते.
डाउन पेमेंट: बँका सहसा 80% पर्यंत लोन देतात, त्यामुळे 20% रक्कम तुमच्याकडे डाउन पेमेंटसाठी असावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe