बँकेकडून 50 लाखाचे होम लोन मिळवण्यासाठी महिन्याचा पगार अन CIBIL Score किती असायला हवा ?

SBI ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक, ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.25% इंटरेस्ट रेट वर होम लोन उपलब्ध करून देत आहे. या बँकेकडून महिलांना होम लोनवर विशेष सवलत सुद्धा दिली जात आहे. दरम्यान आज आपण एसबीआय बँकेकडून 50 लाख रुपयांचे गृह कर्ज घ्यायचे असेल तर मासिक उत्पन्न किती असायला हवं याबाबतचा आढावा आजच्या या लेखातुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Home Loan : तुम्हालाही घर खरेदीसाठी कर्ज घ्यायचे आहे का मग आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. आज आपण 50 लाखाचे होम लोन घ्यायचे असेल तर महिन्याचा पगार किती असायला हवा आणि यासाठी सिबिल स्कोर किती असणे आवश्यक आहे याबाबत माहिती पाहणार आहोत. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये घर खरेदी करणे फारच अवघड बनले आहे. दिवसागणिक घरांच्या किमती वाढतच आहेत यामुळे लवकरात लवकर घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे अशी अनेकांची इच्छा आहे.

दरम्यान जर तुमचीही अशीच इच्छा असेल आणि तुम्ही एसबीआय कडून होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या होम लोनची सविस्तर माहिती सांगणार आहोत.

एसबीआय कडून 50 लाखाचे होम लोन घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार, 50 लाखाचे होम लोन मिळवण्यासाठी मासिक पगार किती असायला हवा, यासाठी किती सिबिल स्कोर असणे आवश्यक आहे? याच साऱ्या मुद्द्यांचा आज आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Home Loan साठी किती Cibil Score हवा?

जर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेकडून गृह कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोर हा किमान 750 च्या आसपास असणे आवश्यक आहे.

तुमचा सिबिल स्कोर जर 800 असेल तर तुम्हाला एसबीआय कडून सहजतेने कर्ज मंजूर होऊन जाईल. शिवाय अशा व्यक्तींना एसबीआय बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

SBI चे Home Loan साठीचे व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून आपल्या ग्राहकांना 8.25 टक्क्यांपासून ते 9.20% व्याज दराने गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. पण 8.25 टक्के व्याज दराने अशाच व्यक्तींना कर्ज दिले जाते ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो.

50 लाखाचे कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता?

एसबीआय बँकेकडून 30 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृह कर्ज 8.25 टक्के इंटरेस्ट रेटने मंजूर झाले तर 37 हजार 563 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच 85 लाख 22 हजार 799 रुपये फक्त व्याज म्हणून बँकेला द्यावे लागणार आहेत.

किती पगार हवा?

50 लाखाचे होम लोन घेण्यासाठी इन हॅन्ड मंथली सॅलरी ही 75 हजार रुपयांची असणे आवश्यक आहे. अर्थातच 75 हजार रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना एसबीआय कडून 50 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज मंजूर केले जाऊ शकते. परंतु यासाठी आधीच तुमच्यावर दुसऱ्या कर्जाचे ओझे नसणे आवश्यक आहे. आधीच एखाद कर्ज असेल तर तुम्हाला एवढी रक्कम मंजूर होऊ शकत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe