होम लोन फक्त २.२५ टक्के व्याजदराने मिळणार ? घर खरेदीदारांसाठी मोठी आनंदाची बातमी !

Published on -

Home Loan : गृहकर्ज म्हणजे आयुष्यभराचा बोजा, अशी सर्वसाधारण समजूत आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे थोडे जरी अतिरिक्त पैसे हातात आले, तरी ते गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडण्यासाठी वापरण्याकडे अनेकांचा कल असतो. रिझर्व्ह बँकेने २०१४ पासून गृहकर्जाच्या मुदतीपूर्वी फेडीवर दंड रद्द केल्यानंतर हा कल आणखी वाढला. कर्जमुक्त झाल्याचा अभिमानही अनेक जण मिरवतात. मात्र, हा निर्णय आर्थिकदृष्ट्या नेहमीच योग्य ठरतो का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

आज उपलब्ध असलेले गृहकर्ज हे सर्वात स्वस्त कर्ज मानले जाते. सध्या रेपो दराशी निगडित गृहकर्ज साधारण ७ ते ७.५ टक्के व्याजदराने उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर, जर या स्वस्त कर्जाची मुदतीपूर्वी परतफेड करण्याऐवजी तेच पैसे योग्य ठिकाणी गुंतवले, तर अधिक फायदा होऊ शकतो.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने १ कोटी रुपयांचे गृहकर्ज १५ वर्षांसाठी ७.२५ टक्के व्याजदराने घेतले, तर मासिक हप्ता सुमारे ९० हजार रुपयांचा येतो. सुरुवातीच्या काही वर्षांत ईएमआयमधील मोठा हिस्सा व्याजासाठी जातो आणि मुद्दल फारसे कमी होत नाही. त्यामुळे आठ वर्षांत कर्ज पूर्ण फेडायचे असल्यास सुमारे ६५ लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम भरावी लागते.

हीच ६५ लाख रुपयांची रक्कम जर लार्ज कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवली, तर दीर्घकालीन सरासरी १२ ते १२.५ टक्के परतावा मिळू शकतो. अशा परिस्थितीत, एका बाजूला गृहकर्जावर ७.२५ टक्के व्याज भरले जात असताना, दुसऱ्या बाजूला गुंतवणुकीतून साधारण ५ टक्क्यांचा निव्वळ फायदा मिळू शकतो. परिणामी, १५ वर्षांच्या कालावधीत १ कोटी रुपयांच्या गृहकर्जावरील प्रत्यक्ष व्याजदर सुमारे २.२५ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो.

अर्थात, रेपो दर, शेअर बाजारातील चढ-उतार आणि म्युच्युअल फंडांचा परतावा यामध्ये बदल होऊ शकतो. तरीही, सात वर्षांहून अधिक कालावधीसाठी शिस्तबद्ध गुंतवणूक केली आणि थोडी जोखीम स्वीकारण्याची तयारी ठेवली, तर गृहकर्जाला बोजा न मानता भांडवल म्हणून वापरणे हा एक व्यवहार्य आणि आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचा मार्ग ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe