3 बीएचके घर बांधण्यासाठी प्लॉटची साईज किती असायला हवी ? तज्ञ म्हणतात यापेक्षा कमी…..

अनेकांना स्वतः प्लॉट घेऊन घर बनवायचे आहे. जर तुमचाही असाच प्लॅन असेल तर आज आम्ही तुम्हाला तीन बीएचके बंगला बांधण्यासाठी प्लॉटची साईज किती असायला हवी याबाबत माहिती सांगणार आहोत.

Published on -

Home Plot Buying Tips : तुम्हीही नवीन घर बनवण्याचे स्वप्न पाहिलंय अन ते स्वप्न आता सत्यात उतरवण्याचा तुमचा प्लॅन आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण प्लॉट बायिंग टिप्स जाणून घेणार आहोत. खरंतर, अनेक जण प्लॉट घेऊन स्वतः घर बनवण्याचा निर्णय घेतात. आधीच तयार केलेले घर, बंगलो, रो हाऊस किंवा फ्लॅट खरेदी करणे काही लोकांना आवडत नाही.

आपलं स्वप्नातील घर आपण ठरवू तसंच पाहिजे अशी अनेकांची इच्छा असते आणि यासाठी अनेक जण प्लॉट खरेदी करतात. दरम्यान जर तुम्ही हे आगामी काळात घर बांधण्यासाठी प्लॉट खरेदीच्या प्लॅनिंग मध्ये असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

3 बीएचके घर बांधण्यासाठी प्लॉटची साईज किती असायला हवी याच संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम घरासाठी स्टॅंडर्ड साईज किती असावी? ही गोष्ट वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते.

आपली गरज, बजेट आणि भविष्यातील प्लॅनिंग या साऱ्या घटकांवर घरासाठी ची स्टॅंडर्ड साईज ठरवली जाऊ शकते. मात्र असे असले तरी जाणकार लोक ज्या प्लॉटची साईज लांबी आणि रुंदी मध्ये 1:2 च्या गुणोत्तरात असते तो प्लॉट घर बांधण्यासाठी अगदीच योग्य असल्याचे सांगितले आहे.

वास्तुशास्त्रात देखील अशाच प्लॉट साईजमध्ये घराची निर्मिती केली पाहिजे असे सांगितले गेले आहे. जर प्लॉटची लांबी उत्तरेकडे आणि रुंदी पश्चिमेकडे असेल तर असा प्लॉट घरासाठी सर्वात बेस्ट ठरतो.

आता आपला मेन प्रश्न म्हणजे 3 बेडरूमचा बंगला उभारायचा असेल म्हणजेच तीन बीएचके बंगलो तयार करायचा असेल तर प्लॉट साईज किती असायला हवी.

जाणकार लोकांनी याबाबत बोलताना असे म्हटले आहे की डिझाईन आणि लेआउटच्या आधारावर तीन बीएचके बंगलो तयार करण्यासाठी साधारणता 1000 ते 1800 स्क्वेअर फुट एवढी साईजचा प्लॉट आवश्यक राहणार आहे.

जर तुमचा परिवार पाच लोकांचा असेल तर तुम्ही बाराशे स्क्वेअरफूट मध्ये बंगलो तयार करू शकता. जर तुम्हाला अतिरिक्त जागा हवी असेल तर 1500 ते 1800 स्क्वेअर फूटवर तयार करण्यात आलेला बंगलो तुमच्यासाठी फायद्याचा राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News