तुम्हाला बँकेकडून एक कोटीचे Home Loan मिळू शकते का ? 1 करोड रुपयांच्या गृहकर्जासाठी मासिक पगार किती हवा ?

तुम्हालाही गृह कर्ज घ्यायचे आहे का ? मग ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण एक कोटी रुपयांच होम लोन हवं असेल तर मासिक पगार किती पाहिजे ? याचा आढावा घेणार आहोत.

Published on -

Home Loan News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई पुणे नागपूर नाशिक हैदराबाद बंगलोर अशा मोठ्या शहरांमध्ये घराच्या किमती कोटींच्या घरात पोहोचल्या आहेत. साहजिकच करोडो रुपयांचे घर घ्यायचे असेल तर होम लोन घ्यावेच लागते.

महत्त्वाचे बाब म्हणजे रेल्वे स्टेट क्षेत्रातील जाणकार लोक गृह कर्ज घेऊन घर निर्मितीचे स्वप्न पूर्ण करणे वाईट नसल्याचे सांगतात. होम लोन घेण्याचे काही फायदे सुद्धा आहेत, असा दावा रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोकांकडून केला जातो.

मात्र अनेकांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचे होम लोन हवे असेल तर मासिक पगार किती असायला हवा? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशा परिस्थितीत आज आपण तुम्हाला एक कोटी रुपयांचे होम लोन मिळू शकते का याचा आढावा घेणार आहोत.

एक कोटी रुपयांचे होम लोन हवे असल्यास किती पगार पाहिजे?

होम लोन मंजूर करताना बँकांच्या माध्यमातून तुमच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाते. तुमची मंथली इनकम किती आहे, तुमचा सिबिल स्कोर कसा आहे, तुमची कर्ज परतफेड करण्याची क्षमता, नोकरीची स्थिती अशा वेगवेगळ्या बाबींची पडताळणी करून बँक तुम्हाला होम लोन मंजूर करते.

दरम्यान जर तुम्हाला एक कोटी रुपयांचे होम लोन घ्यायचे असेल तर तुमचा मासिक पगार देखील त्या योग्यतेचा असणं आवश्यक आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांचा मासिक पगार एक लाख 53 हजार रुपये एवढा आहे त्या लोकांना वीस वर्षांच्या कालावधीसाठी एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर होऊ शकते.

मात्र यासाठी तुमच्यावर आधीच कोणतेही कर्ज नसावे. जर तुमच्या डोक्यावर आधीच कर्जाचे ओझे असेल तर तुम्हाला एक लाख 53 हजार रुपये एवढा पगार असतानाही तुम्हाला एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर होऊ शकत नाही.

एक कोटीचे कर्ज 20 वर्षांसाठी मंजूर झाले तर कितीचा हप्ता भरावा लागणार?

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे एक लाख 53 हजार रुपये मासिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक कोटी 60 हजार 494 रुपये इतके होम लोन मंजूर होऊ शकते.

जर समजा तुम्हाला एक कोटी 60 हजार 494 रुपयांचे होम लोन 8% व्याजदरात वीस वर्षासाठी मंजूर झाले तर तुम्हाला 84 हजार 150 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!