petrol Pump Monthly Income : गेल्या काही वर्षांच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने महागाईचा दर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वाढत्या महागाईमुळे आणि इंधनाच्या किमतीमुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी आहे.
पण अशा या परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून इंधनाच्या किमती नेहमीच तेजीत राहतात मग पेट्रोल पंप मालकांना पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून किती कमिशन मिळते असा प्रश्न उपस्थित केला जातोय. म्हणून आता आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे आजची ही बातमी सर्वसामान्य नागरिकांसाठीही कामाची राहणार आहे आणि ज्या लोकांचा पेट्रोल पंपचा व्यवसाय सुरू करण्याचा प्लॅन आहे त्यांच्यासाठी देखील कामाची राहणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलवर किती कमिशन मिळते?
जाणकार लोक सांगतात की पेट्रोल आणि डिझेल वरील पंप मालकांचे जे कमिशन आहे ते कमिशन इंडियन ऑयल (IOCL), हिंदुस्तानपेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) सारख्या ऑइल कंपन्यांकडून ठरवले जाते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सध्या पेट्रोलची किंमत 94.77 इतकी आहे आणि इथे एक लिटर पेट्रोल मागे 4.39 रुपये म्हणजेच दहा लिटर मागे 43.9 रुपये इतके कमिशन मिळते. दिल्लीत डिझेलची किंमत 87.67 रुपये प्रति लिटर इतकी असून डिझेल विक्रीतून पंप मालकांना एका लिटरमागे 3.02 रुपयांचेम्हणजेच दहा लिटर मागे 30.2 रुपये इतके कमिशन मिळते.
मात्र, पेट्रोल पंप मालकांना पेट्रोल पंपावरील सर्व खर्च जसे की कर्मचाऱ्यांचे पगार, वीज, मेंटेनन्स अशा सर्व बाबींवरील खर्च वजा केला असता पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधनाच्या विक्रीतून लिटर मागे एक ते दीड रुपयांचा नफा मिळतो. म्हणजेच पेट्रोलच्या विक्रीतून पंप मालकांना दहा लिटर मागे दहा ते पंधरा रुपये नफा मिळतो आणि डिझेलच्या विक्रीतूनही पंप मालकांना 10 ते 15 रुपये इतका निव्वळ नफा मिळतो.
महिन्याला किती कमाई होते ?
खरे तर पेट्रोल पंप मालकाला पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून महिन्याला किती कमाई होणार हे त्याच्या विक्रीवर अवलंबून राहणार आहे. मात्र असे असले तरी आज आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून महिन्याच्या कमाईचे गणित समजून घेऊयात. जर समजा एखाद्या पेट्रोल पंप वर दररोज 5000 लिटर इतके पेट्रोल विकले जात असेल तर त्याला 21,950 इतके कमिशन मिळणार आहे. तसेच जर त्याच्या पंपावर पाच हजार लिटर इतके डिझेल विकले जात असेल तर त्याला पंधरा हजार शंभर रुपये इतके कमिशन मिळणार आहे.
म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल विक्रीतून त्याला दिवसाला 37 हजार रुपयांचे कमिशन मिळू शकते. आता महिन्याचा विचार केला असता कमिशनचा हा आकडा 11.10 लाखांवर जातो. पण खर्च वजा करता सदर पंप मालकाला पाच लाख रुपयांपर्यंतचा नफा राहू शकतो. मात्र यासाठी सदर पंपावर दररोज दहा हजार लिटर पेट्रोल आणि डिझेल विक्री होणे आवश्यक आहे.