सोन्याच्या किमतीत सलग पाचव्या दिवशी मोठी वाढ ! 5 जून 2025 रोजी 10 ग्रॅमचे दागिने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

24 कॅरेट सुद्धा सोन्याची किंमत पुन्हा एकदा एका लाखाच्या जवळ पोहोचली आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे आणि म्हणूनच आज आपण मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव यासारख्या प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती जाणून घेणार आहोत. 

Published on -

Gold Price Today : सोन खरेदीसाठी सराफा बाजारात जाणार आहात का ? मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. आज आपण या मौल्यवान धातूच्या किमतीचा आढावा घेणार आहोत. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ नमूद करण्यात आली आहे.

पाच दिवसांपूर्वी अर्थातच एक जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 310 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी होती. दोन जून रोजी हीच किंमत 98 हजार 840 रुपयांवर पोहोचली, म्हणजे सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मध्ये 1530 रुपयांची वाढ झाली.

नंतर 3 जून रोजी सोन्याची किंमत 99 हजार 60 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली. काल अर्थातच 4 जून 2025 रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ झाली. काल सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 110 रुपयांची वाढ झाली आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99,170 रुपयांवर पोहोचली. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढीचा ट्रेंड पाहायला मिळतोय.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला सोन खरेदी करण्यासाठी जायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला सोन्याच्या लेटेस्ट किमती सांगणार आहोत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,390 प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 910 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

पुणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,390 प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 910 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

नागपूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,390 प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 910 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

ठाणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,390 प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 910 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

कोल्हापूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,390 प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 910 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

जळगाव : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,390 प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 910 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 180 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

नाशिक : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,420 प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

लातूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,420 प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

वसई विरार : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,420 प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

भिवंडी : 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,420 प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News