जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) किती वाढणार ? समोर आली मोठी आकडेवारी !

जुलै महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार हा मोठा सवाल आहे. मात्र आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे. कामगार मंत्रालयाकडून महागाई भत्ता वाढीची नवीन आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

Published on -

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. केंद्रातील सरकारकडून पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे. खरेतर, केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक जुलै महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. कारण म्हणजे या महिन्यात सरकार महागाई भत्ता वाढवत असते. सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. त्याचा फायदा लहान कर्मचाऱ्यांपासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच होतो.

या चालू वर्षात म्हणजे 2025 बाबत बोलायचं झालं तर एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळालेली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील आज महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% एवढा झाला असून आज राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 55% इतका वाढवण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू आहे.

सरकार दरवर्षी जानेवारीमध्ये आणि जुलैमध्ये महागाई भत्ता वाढवत असते. दरम्यान, जानेवारी 2025 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका करण्यात आला म्हणजेच महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ झाली. यामुळे आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार? हा मोठा सवाल सरकारी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होतोय. गेल्या वेळी महागाई भत्ता 2 टक्के वाढवण्यात आला होता, जो गेल्या 78 महिन्यांतील सर्वात कमी आहे. अशा परिस्थितीत आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार, डीए मध्ये दोन टक्क्यांची वाढ होणार की तीन टक्क्यांची? हाच मोठा सवाल उपस्थित होतोय.

यावेळी डीए किती वाढणार ?

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 55 टक्के आहे. मात्र या महागाई भत्ता वाढीमुळे 1.2 कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश झाले आहेत. कारण जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आलेली महागाई भत्ता वाढ गेल्या 78 महिन्यातील सर्वात कमी वाढ होती. अशातच आता सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. यामुळे सरकार जुलैमध्ये DA 3 % किंवा 4 टक्क्यांनी वाढवणार अशी अपेक्षा सरकारी कर्मचारी आणि संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पण या संदर्भात अजून अधिकृत माहिती हाती आलेली नाही. कारण की महागाई भत्ता AICPI आकडेवारीनुसार ठरतो. जानेवारी 2025 जून 2025 या कालावधीमधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जुलैपासून महागाई भत्ता किती वाढणार हे ठरणार आहे. सध्या स्थितीला या सहा महिन्यांपैकी फक्त तीन महिन्यांची आकडेवारी समोर आलेली आहे. या पहिल्या तीन महिन्यांच्या आकडेवारीनुसार आणि जर अशीच आकडेवारी पुढील तीन महिनेही कायम राहिली तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावेळी तीन टक्क्यांनी वाढू शकतो असा एक अंदाज सांगितला जात आहे.

आकडेवारी काय सांगते ?

खरं तर, कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कामगार ब्युरोने मार्च 2025 साठीचा ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स (सीपीआय-आयडब्ल्यू) डेटा जारी केला आहे. यात मार्च महिन्यात थोडीशी सुधारणा दिसली आहे. मार्चमध्ये, सीपीआय-आयडब्ल्यू निर्देशांक 0.2 अंकांनी वाढून 143 वर पोहोचलेत. हे जानेवारीच्या 143.2 पेक्षा थोडे कमी आहे, मात्र हे आकडे फार वाईट नाहीयेत. कारण की, नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान CPI-IW मध्ये सातत्याने घट होत होती. मात्र मार्चमध्ये ही आकडेवारी चांगली बनलीय आणि यामुळे एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यात देखील ही आकडेवारी अशीच तेजीत राहील आणि याचा फायदा म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe