बातमी कामाची ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज कसा करायचा ? वाचा ए टू झेड माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

Driving License Application : गेल्या काही वर्षात ऑटो क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. आता प्रत्येकाकडेच आपले स्वतःचे वाहन आहे. काही लोकांकडे दुचाकी वाहने आहेत तर काही लोकांकडे चारचाकी वाहने आहेत. तसेच काही लोकांकडे व्यावसायिक वाहने देखील आहेत. भारतात मात्र कोणतेही वाहन चालवायचे असेल तर त्यासाठी परवाना लागतो.

वाहन चालवण्याचा परवाना अर्थातच ड्रायव्हिंग लायसन्स असल्याने नागरिकांना देशात कुठेही वाहन चालवता येते. याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स हे शासकीय कामांसाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे कागदपत्र देखील आहे. याचा उपयोग वेगवेगळ्या शासकीय योजनांमध्ये होतो. मात्र सर्वसामान्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

अशा परिस्थितीत आज आपण घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज कसा करायचा या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच आता नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणे हेतू कोणत्याच शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

मात्र, कायमस्वरूपी परवाना काढण्यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जावे लागणार आहे. परंतु आज आपण लर्निंग लायसन्स काढण्याची प्रोसेस जाणून घेणार आहोत. खरे तर लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे आता घरबसल्या नागरिकांना लर्निंग लायसन्स काढता येणार आहे.

लर्निंग लायसन्स काढण्याची प्रोसेस

लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध झालेली आहे. https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लर्निंग लायसन्स साठी अर्ज करता येणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर इच्छुक व्यक्तींना राज्याचा पर्याय निवडावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला तिथे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. यातून तुम्हाला शिकाऊ परवान्याचा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. मग शिकाऊ परवाना अर्थातच लर्निंग लायसन्ससाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. हा अर्ज भरताना तुम्हाला आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. मग तुम्हाला तुमच्या नंबरवर पाठवलेला ओटीपी टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी आवश्यक असलेले शुल्क ऑनलाईन भरावे लागणार आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होणार आहे. एकदा की अर्ज झाला की सात दिवसाच्या आत सदर अर्जदार व्यक्तीला लर्निंग लायसन्स दिले जाणार आहे. हा परवाना पोस्टाने पाठवला जाणार आहे. परंतु कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागणार आहे.

लर्निंग लायसन्स काढण्यासाठी कोण-कोणते कागदपत्रे लागतात?

मिळालेल्या माहितीनुसार लर्निंग लायसन्स करिता अर्ज करणे हेतू इच्छुक अर्जदारांना आधारकार्ड, मतदानकार्ड, रहिवासी दाखला, जन्मतारीख प्रमाणपत्र (दहावी मार्कशीट, जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र), पॅनकार्ड, रेशनकार्ड, वीज बिल, पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी, मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe