How To Check Cibil Score : तुम्हीही बँकेकडून कर्ज घेणार आहात का ? मग बँकेच्या पायऱ्या चढण्या आधी आजची बातमी पूर्ण वाचा. खरे तर बँक कर्ज देण्यापूर्वी आवश्यक सर्व कागदपत्रांची पडताळणी करत असते. तुमची कर्ज फेडण्याची स्थिती आहे की नाही याची बँक पडताळणी करते आणि त्यानंतर तुम्हाला कर्ज मंजूर केले जाते. कर्ज मंजूर करण्याआधी बँकांकडून तुमचा सिबिल स्कोर सुद्धा चेक केला जातो.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का? बँकेकडून कर्ज मंजूर होण्यासाठी सिबिल स्कोर किती असायला हवा? किती सिबिल स्कोर असल्यास बँका सहज करतो मंजूर करतात ? याबाबत तुम्ही कधी माहिती घेतली आहे का? नाही ना मग आता आपण याच मुद्द्यांचा तपशीलवार आढावा घेणार आहोत.

आज आपण किमान किती सिबिल स्कोर असल्यास बँकांकडून कर्ज मंजूर केले जाऊ शकते आणि सिबिल स्कोर चांगला मेंटेन ठेवण्यासाठी काय करायला हवे याबाबत माहिती पाहणार आहोत.
किमान किती Cibil Score असायला हवा?
कोणत्याही बँकेकडून कर्ज मंजूर करण्यापूर्वी आधी व्यक्तीचा सिबिल स्कोर चेक केला जातो. मात्र, किती सिबिल स्कोर असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर होते? याबाबत आरबीआयकडून काहीच नियम तयार करण्यात आलेले नाहीत.
आरबीआय ने याबाबत कोणत्याच मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. पण, सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान गणला जातो. 750 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असल्यास बँकेकडून सहजतेने कर्ज मंजूर होते. यापेक्षा कमी सिबिल स्कोर असेल तर बँका कर्ज देताना विचार करतात.
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे 300 ते 600 दरम्यानचा सिबिल स्कोर हा खराब मानला जातो. यादरम्यान जर सिबिल स्कोर असेल तर बँकांकडून सहजासहजी कर्ज मंजूर होत नाही.
काही प्रकरणात बँकेने कर्ज मंजूर केले तर बँकेकडून अशा व्यक्तींकडून अधिकचे व्याज वसूल केले जाते. एकंदरीत 750 पेक्षा अधिकचा सिबिल स्कोर असेल तर बँका सहजतेने कर्ज देतात आणि यासाठी व्याजदर देखील नियमानुसार आणि परवडणारा व्याजदर आकारला जातो.
सिबिल स्कोर कसा सुधारावा?
नवीन कर्जासाठी अर्ज करणे टाळा : नवीन कर्जासाठी वारंवार अर्ज केल्याने आपल्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे नवीन कर्जासाठी सतत अर्ज करणे टाळायला हवे.
क्रेडिट रिपोर्टची नियमित तपासणी करावी : जाणकार लोक सांगतात की, नियमितपणे आपला क्रेडिट अहवाल तपासल्यास आणि यात कोणतीही त्रुटी असल्यास ही त्रुटी दूर केली पाहिजे.
क्रेडिट लिमिट मर्यादेत ठेवा : क्रेडिट कार्ड धारकांनी आपल्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त वापर करू नये. अधिक वापर आपल्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम करू शकतो.
कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडा : जर तुम्ही एखाद्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलेले असेल तर ते कर्ज वेळेवर फेडा अन यामुळे सिबिल स्कोर सुधारतो.
क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा : तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही त्याचा वापर करत असाल तर त्याची बिले तुम्हाला वेळेवर भरावी लागणार आहेत. असे केल्यास तुमचा सिबिल स्कोर सुधारतो.
जुन्या कर्जास नेहमी प्राधान्य द्या : जर तुम्ही अधिक व्याजदराचे एखादे कर्ज घेतले असेल तर ते कर्ज तुम्ही पहिले फेडायला हवे. तुम्ही वेळेत कर्ज फेडल्यास तुमचा सिबिल स्कोर तर सुधारणारच आहे पण यामुळे तुमची आर्थिक घडी देखील विस्कटणार नाही.