वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी ! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढ मिळणार, शेवटची तारीख काय? वाचा…

Published on -

HSRP Number Plate : राज्यातील वाहनाचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारने 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट कंपल्सरी केली आहे. दरम्यान जर तुम्ही अद्याप HSRP नंबर प्लेट बसवलेली नसेल तर आजची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. खरे तर हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट इन्स्टॉल केलेली नसेल तर सरकार वाहन चालकांकडून मोठा दंड वसूल करणार आहे.

दरम्यान आता आपण एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनचालकांना किती दिवसांची मुदत देण्यात आली आहे आणि या मुदतीत वाहन चालकांनी जर नंबर प्लेट बसवली नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होणार यासंदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

HSRP प्लेट बसवण्यासाठी किती दिवसांची मुदत?

मिळालेल्या माहितीनुसार 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाहनचालकांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट इन्स्टॉल करावी लागणार आहे. एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असणाऱ्या सर्व वाहनांसाठी ही नवीन प्लेट कंपल्सरी करण्यात आली आहे.

खरंतर हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी आत्तापर्यंत तीन वेळा मुदत वाढ देण्यात आली आहे. सुरुवातीला एप्रिल अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीत फारच कमी लोकांनी ही नवीन प्लेट इन्स्टॉल केली आणि यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी उपस्थित झाली.

या मागणीची दखल घेत सरकारने जून अखेरपर्यंत नंबर प्लेट इन्स्टॉल करण्यासाठी मुदत दिली. नंतर ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ मिळाली. परंतु ऑगस्ट अखेरपर्यंत देखील फारच कमी लोकांनी HSRP नंबर प्लेट इन्स्टॉल केली आणि यामुळे आता नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदत वाढ देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे.

आतापर्यंत सरकारकडून तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे पण तरीही राजधानी मुंबई सह राज्यातील बहुतांशी लोकांनी नवीन हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवलेले नाही आणि यामुळे आता पुन्हा एकदा सरकारकडून मुदतवाढ दिली जाणार का हा मोठा सवाल उपस्थित होतोय.

दरम्यान यासंदर्भात परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी अद्याप सरकारने या कामासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला नसल्याची माहिती दिली आहे. म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी 30 नोव्हेंबर ही मुदत फायनल आहे.

दरम्यान या मुदतीत वाहनचालकांनी जर नवीन हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवली नाही तर त्यांना दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. या तारखेनंतर अर्ज केलेला असेल पण एचएसआरपी प्लेट बसवलेली नसेल तर अशा लोकांना एक हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.

तसेच 30 नोव्हेंबरपर्यंत HSRP प्लेटसाठी अर्ज केलेला नसेल तर अशा वाहन चालकांकडून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत राज्यातील 40% वाहनचालकांनी नवीन प्लेट बसवलेली आहे.

यामुळे आता सरकार 30 नोव्हेंबर नंतरही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पण जर मुदतवाढ मिळाली नाही तर HSRP प्लेट न बसवलेल्या वाहन चालकांकडून मोठा दंड मात्र वसूल होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News