Hudco चा शेअर गुंतवणूकदारांना बनवणार मलामाल ! जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा

मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसत असून आगामी काळात ही तेजी अशीच कायम राहावे अशी गुंतवणूकदारांची इच्छा आहे. दरम्यान आज चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसली असून या तेजीच्या काळातच हुडकोचा शेअर्स देखील तेजीत येण्याची शक्यता आहे.

Published on -

Hudco Share Price : आज सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसेल. यामुळे कधी नव्हे ते गुंतवणूकदारांचे चेहरे थोडेसे खुललेत. मार्केट गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या जागतिक घडामोडींमुळे तसेच देशांतर्गत सुरू असणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात डाऊन झाले आहे.

पण आता मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसत असून आगामी काळात ही तेजी अशीच कायम राहावे अशी गुंतवणूकदारांची इच्छा आहे. दरम्यान आज चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसली असून या तेजीच्या काळातच हुडकोचा शेअर्स देखील तेजीत येण्याची शक्यता आहे.

यामुळे ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली असून आज आपण या स्टॉकची शेअर मार्केट मधील सध्याची परिस्थिती आणि या स्टॉकबाबत तज्ज्ञांचा नेमका काय अंदाज आहे? याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हूडकोची शेअर बाजारातील सध्याची स्थिती

हाउसिंग अँड अर्बन डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच हुडकोच्या शेअरची प्रिव्हियस क्लोजिंग प्राईस 216.28 रुपये होती. काल हा स्टॉक 216 पॉईंट 28 रुपयांवर क्लोज झाला आणि आज शुक्रवार, 31 जानेवारी 2025 रोजी दिवसभरात हाउसिंग अँड अर्बन डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर 214.74 – 231.00 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होते.

आज या स्टॉक मध्ये 6.25 टक्क्यांची तेजी आली होती. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 353.70 रुपये अन 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 152.55 रुपये इतका राहिलाय. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 45,969 Cr. रुपये इतके आहे. तसेच, कंपनीवर 93,565 Cr. रुपये इतकं कर्ज आहे.

या स्टॉकने गुंतवणूकदारांना किती परतावा दिला

हा स्टॉक मागील 5 दिवसात 8.39 टक्क्यांनी वाढला आहे. पण, मागील 1 महिन्यात हाउसिंग अँड अर्बन डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड शेअर -1.71 टक्क्यांनी, मागील 6 महिन्यात -26.12 टक्क्यांनी घसरला आहे. मागील 1 वर्षात हा शेअर 33.86 टक्क्यांनी वाढला आहे.

YTD आधारावर हा शेअर -2.99 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र मागील 5 वर्षात शेअर 495.35 टक्क्यांनी वाढला आहे. शिवाय लॉन्ग टर्ममध्ये हा स्टॉक 217.99 टक्क्यांनी वाढलाय. आता आपण यासाठी कोणत्या ब्रोकरेजने बाय रेटिंग दिली आहे आणि टारगेट प्राईज काय देण्यात आली आहे याबाबत माहिती पाहूयात.

टारगेट प्राईज काय आहे

एसबीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हाउसिंग अँड अर्बन डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीवर विश्वास दाखवला आहे. या कंपनीचा स्टॉक आगामी काळात आणखी वाढणार अशी ब्रोकरेजला आशा आहे.

या शेअरसाठी 280 रुपये टार्गेट प्राईस सह 200 रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील ब्रोकरेजकडून देण्यात आला आहे. ब्रोकरेजने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News