ICICI बँकेत FD केल्यास मिळणार जबरदस्त परतावा, बँकेच्या 15 महिन्यांच्या एफडी योजनेत पाच लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार ?

आयसीआयसीआय बँक सुरक्षित तर आहेचं शिवाय बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याजही ऑफर केले जात आहे. बँकेच्या आकर्षक व्याजदरामुळे गेल्या काही वर्षात आयसीआयसीआय बँकेत एफडी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

Published on -

ICICI Bank FD Scheme : आयसीआयसीआय ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही देशातील सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत येते. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय या देशातील तीन सर्वाधिक सुरक्षित बँका आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही आगामी काळात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आयसीआयसीआय बँकेचा पर्याय बेस्ट ठरणार आहे.

आयसीआयसीआय बँक सुरक्षित तर आहेचं शिवाय बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याजही ऑफर केले जात आहे. बँकेच्या आकर्षक व्याजदरामुळे गेल्या काही वर्षात आयसीआयसीआय बँकेत एफडी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

तुम्हीही फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर नक्कीच आयसीआयसीआय बँकेचा पर्याय तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ठरणार आहे. परंतु, एफडी करण्याआधी आजचा हा लेख तुम्ही पूर्ण वाचायलाच हवा.

कारण की आज आपण आयसीआयसीआय बँकेच्या 15 महिन्यांच्या एफडी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की या कालावधीच्या एफडीवर बँकेकडून किती व्याजदर ऑफर केला जात आहे, या एफ डी मध्ये पाच लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

15 महिने कालावधीच्या एफडीचे व्याजदर

बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बँक 15 ते 18 महिने कालावधीचे एफ डी वर सर्वाधिक व्याज ऑफर करते. या कालावधीचे एफडीवर आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना 7.25% या दराने व्याज ऑफर केले जात आहे.

मात्र ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना याच कालावधीचे एफडीवर 0.55% अधिक व्याजदर लागू आहे. म्हणजेच सीनियर सिटीजन ग्राहकांना या कालावधीच्या एफडीवर 7.80% या दराने व्याज दिले जाते.

5 लाख गुंतवल्यास किती रिटर्न मिळणार?

आयसीआयसीआय बँकेच्या एफडी कॅल्क्युलेटर नुसार, जर बँकेच्या 15 महिने कालावधीच्या एफ डी मध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली तर गुंतवणूकदारांना पाच लाख 47 हजार 94 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच पंधरा महिन्याच्या कालावधीत गुंतवणूकदाराला 47 हजार 94 रुपये रिटर्न म्हणून मिळणार आहेत.

जर समजा पंधरा महिने कालावधीच्या एफ डी मध्ये सीनियर सिटीजन ग्राहकाने पाच लाख गुंतवले तर त्यांना पाच लाख 50 हजार 806 रुपये मिळणार आहेत. अर्थातच सदर गुंतवणूकदाराला 50,806 रुपये व्याज म्हणून दिले जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe