घरबसल्या करा ICICI Bank Personal Loan साठी अर्ज ! पहा लाखाला किती पडेल EMI

Updated on -

ICICI Bank Personal Loan : आयसीआयसीआय ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाते. एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आणि त्या पाठोपाठ आयसीआयसीआय बँकेचा नंबर लागतो.

या बँकेचे करोडो कस्टमर आहेत आणि बँक आपल्या करोडो ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना चालवत आहे. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करून दिले जात आहे.सोबतच बँक एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना देखील चांगला परतावा देत आहे. दरम्यान आज आपण आयसीआयसीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जाची माहिती पाहणार आहोत.

वैयक्तिक कर्जासाठी व्याजदर

त्यामुळे जर तुम्हालाही आगामी काळात वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे थोडेसे अधिक असतात. कोणतीही बँक वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याजदर आकारते.

ICICI Personal Loan ची माहिती

सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय असो की प्रायव्हेट सेक्टर मधील एचडीएफसी सर्वच बँका वैयक्तिक कर्जासाठी इतर कर्जांच्या तुलनेत अधिकचे व्याजदर आकारतात. आयसीआयसीआय बँक देखील वैयक्तिक कर्जासाठी इतर कर्जांच्या तुलनेत अधिकचे व्याज वसूल करत असून आज आपण आयसीआयसीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जाची डिटेल माहिती पाहणार आहोत.

वैयक्तिक कर्जाचे व्याजदर

मिळालेल्या माहितीनुसार आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना 50 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज सहजतेने ऑफर करते. ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना बँकेकडून अधिकचे वैयक्तिक कर्ज दिले जाते तसेच अशा लोकांकडून कमी व्याज वसूल केले जाते.

कमीत कमी व्याजदर 

बँकेच्या वेबसाईट नुसार बँक आपल्या ग्राहकांना सहा वर्ष कालावधीसाठी वैयक्तिक कर्ज ऑफर करते. सहा वर्षे म्हणजेच 72 महिन्यांच्या कालावधीसाठी बँकेकडून आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज दिले जाते आणि यासाठी कमीत कमी व्याजदर आकारण्याचा प्रयत्न बँकेकडून केला जातो.

घरबसल्या कर्जासाठी अर्ज

महत्त्वाची बाब म्हणजे आयसीआयसीआय बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ग्राहकांना वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करता येतो. म्हणजेच ग्राहकांना वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी थेट बँकेत जाण्याची सुद्धा गरज नाही ग्राहक घरबसल्या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात आणि कर्ज मिळवू शकतात.

एक लाख 76 हजार व्याज

मीडिया रिपोर्टनुसार आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना 10.85% दराने वैयक्तिक कर्ज देते. जर समजा एखाद्या ग्राहकाने 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज तीन वर्ष कालावधीसाठी घेतले आणि त्या ग्राहकाला हे कर्ज किमान 10.85% या व्याज दराने उपलब्ध झाले तर त्याला 32 हजार 668 रुपये मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजे सदर ग्राहकाला 11 लाख 76 हजार 48 रुपये भरावे लागतील यामध्ये दहा लाख रुपये मुद्दल आणि एक लाख 76 हजार 48 रुपये व्याज राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe