ICICI Personal Loan : आयसीआयसीआय ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. ही प्रायव्हेट बँक आपल्या ग्राहकांना गृह कर्जासहित वैयक्तिक कर्ज सुद्धा पुरवते. बँकेकडून इतर बँकांच्या तुलनेत स्वस्तात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
खरे तर आयसीआयसीआय बँक ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते. आरबीआय ने एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या तीन बँकांना देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत ठेवलंय.

दरम्यान जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. कारण आज आपण पगारानुसार आयसीआयसीआय बँकेकडून तुम्हाला किती वैयक्तिक कर्ज मंजूर होऊ शकतं याबाबतचा आढावा घेणार आहोत.
आयसीआयसीआय बँकेकडून जास्तीत जास्त किती वैयक्तिक कर्ज मिळणार?
आयसीआयसीआय बँकेकडून ग्राहकांना किती वैयक्तिक कर्ज मिळणार हे त्याच्या उत्पन्नावर आणि सिबिल स्कोर वर ठरत असतं. दरम्यान ग्राहकांच्या पगारानुसार त्यांना किती वैयक्तिक कर्ज मिळेल? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महिन्याला एक लाख रुपयांची ज्या लोकांची कमाई आहे त्यांना आयसीआयसीआय बँकेकडून दोन वर्षांसाठी बारा लाख 62 हजार 47 रुपयांचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
आयसीआयसीआय बँक पर्सनल लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर नुसार ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असेल आणि ज्या लोकांवर आधीपासूनच कोणत्याही प्रकारचे कर्ज नसेल त्यांना बारा लाख 62 हजार 47 रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
मात्र जर तुम्ही एखाद्या कर्जासाठी 25 हजार रुपयांपर्यंतचे ईएमआय भरत असाल तर तुम्हाला एक लाख रुपये पगार असल्यावर सुद्धा फक्त सात लाख छत्तीस हजार रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
एकंदरीत एक लाख रुपये पगार असणाऱ्या लोकांना बँकेकडून साडेबारा लाखाहुन अधिकचे कर्ज मिळू शकते. नक्कीच ज्या लोकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांच्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जाचा पर्याय बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.