ठरलं तर ! ‘हि’ खेळाडू उतरणार निवडणूकीच्या मैदानात

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहे. पीव्ही सिंधूने भारताला दोन ऑलिम्पिक पदक मिळवून दिले आहेत.

पीव्ही सिंधू बॅडमिंटन फेडरेशनची निवडणूक लढणार आहे. ही निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षाकडून लढवली जात नाही. BWF अ‍ॅथलिट आयोगाच्या निवडणुकीत तिने सहभाग घेतलाय आहे.

आत्ता पीव्ही सिंधी बाली येथे इंडोनेशिया ओपन स्पर्धेत खेळत आहे. तिने सहा पदांसाठी होणाऱ्या निवडणूकीत भाग घेतला आहे. या निवडणूकीत एकूण 9 उमेदवार आहेत.

BWF अ‍ॅथलिट आयोगाने दिलेल्या माहितीनुसार हि निवडणूक 2021 ते 2025 या कार्यकाळासाठी होणाऱ्या नियुक्तीसाठी 17 डिसेंबर 2021 ला निवडणूक पार पडणार आहे.

स्पेनमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. खेळाडूंमध्ये केवळ सिंधू दुसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात दिसणार आहे. यापूर्वी 2017 मध्येही सिंधूने या निवडणूकीत बाजी मारली होती.

यंदाच्या निवडकीत सह महिला खेळाडूंचा समावेश आहे. यात इंडोनेशियाची महिला टेनिस स्टार ग्रेसिया पोली हिचाही समावेश आहे. तिने टोकियोमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe