Home Loan News : आपलेही एक घर असावे जिथे आपल्या परिवारासहित आनंदाने आपले उर्वरित आयुष्य घालवता येईल असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. पण अनेकांचे स्वतःचे घर विकत घेण्याचे स्वप्न सहजासहजी पूर्ण होत नाही. अलीकडे जमिनीच्या आणि प्रॉपर्टी च्या किमती इतक्या वाढल्या आहेत की घर खरेदी करणे हे सोपे काम राहिलेले नाही. घर खरेदी करण्यासाठी आता लाखों रुपये लागतात. अशा परिस्थितीत, सामान्य माणसाला घर विकत घेण्यासाठी आयुष्यातील कमाई देखील अपुरी पडते. अशा परिस्थितीत, अनेक जण बँकेकडून गृह कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात.
बँकेकडून गृह कर्ज घेऊन घर खरेदी करणे हा एक उत्तम पर्याय सुद्धा आहे. आधी आपल्या भारतीय संस्कृतीत कर्ज घेणे वाईट मानले जात होते. मात्र आता रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक होम लोन घेऊन गृह खरेदी करणे वाईट नसल्याचे म्हणतात. पण जाणकार लोकांनी नेहमी अशा बँकांकडून कर्ज घेण्याचा सल्ला दिला आहे ज्या की स्वस्तात गृह कर्ज देतात. दरम्यान आता आपण देशातील अशा दोन प्रमुख बँकांची माहिती पाहणार आहोत ज्या की आपल्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देते. एसबीआय आपल्या ग्राहकांना 8.25 टक्के व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. जर एसबीआय कडून एखाद्या ग्राहकाला 8.25% व्याजदरात तीस लाख रुपयांचे गृह कर्ज 15 वर्षांसाठी मंजूर झाले तर अशा प्रकरणात संबंधित ग्राहकाला 22 लाख 38 हजार 758 रुपये व्याज द्यावे लागणार आहे. म्हणजेच ग्राहकाला एकूण 52 लाख 38 हजार 758 रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत. संबंधित ग्राहकाला 29 हजार 104 रुपयांचा मासिक हप्ता करावा लागणार आहे.
HDFC : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. हे बँक आपल्या ग्राहकांना 8.75 टक्के व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देते. जर या व्याजदरात एचडीएफसी कडून एखाद्या ग्राहकाला 30 लाखांचे कर्ज 15 वर्षांसाठी मंजूर झाले तर अशा प्रकरणात संबंधित ग्राहकाला 29 हजार 983 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. या कॅल्क्युलेशन नुसार संबंधित ग्राहकाला 23 लाख 97 हजार 23 रुपये व्याज भरावे लागणार आहे. म्हणजेच व्याज आणि मुद्दल असे एकूण 53 लाख 97 हजार 23 रुपये भरावे लागणार आहेत.