SBI कडून 30 लाखाचे Home Loan हवे असल्यास मासिक पगार किती हवा ? वाचा सविस्तर

तुम्हाला होम लोन घ्यायचे आहे का? मग तुमच्यासाठी एसबीआयचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. कारण ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आपल्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.

Published on -

Home Loan : तुम्हालाही तुमचे हक्काचे घर बांधायचे आहे का? मग आजची ही बातमी तुमच्याच कामाची आहे. कारण आज आपण तीस लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर तुमचा मासिक पगार किती असायला हवा या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि यामुळे नवीन घरनिर्मितीसाठी होम लोनचा पर्याय स्वीकारला जातोय. होम लोन घेऊन अनेकांनी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे तर अजूनही अनेक जण होम लोन घेण्याच्या तयारीत आहेत.

पण बँका होम लोन मंजूर करताना व्यक्तीच्या कर्ज परतफेड ची क्षमता चेक करतात, त्यांचे उत्पन्न शोधतात तसेच त्यांच्यावर आधीपासूनच कर्ज आहे की नाही अशा काही गोष्टींची पडताळणी करत असतात. व्यक्तीच्या मासिक पगाराच्या आधारावरच त्याला किती होम लोन मंजूर होणार हे ठरत असते. म्हणून आज आपण तीस लाखांचे होम लोन हवे असल्यास किती मासिक पगार असायला हवा याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

तीस लाखांच्या कर्जासाठी किती पगार हवा?

जर तुम्ही एसबीआय कडून म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया कडून होम लोन घेणार असाल तर तुम्हाला एसबीआय 8.95% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देऊ शकते. मात्र बँकेचा हा किमान व्याजदर आहे आणि या व्याजदराचा फायदा फक्त आणि फक्त अशाच ग्राहकांना होतो ज्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे. किमान 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना या व्याजदरात होम लोन मंजूर होते. दरम्यान जर तुम्हाला एसबीआय कडून 30 लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर तुमचा मासिक पगार 46 हजाराच्या आसपास असायला हवा. मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीचा पगार 46 हजार रुपये प्रति महिना एवढा आहेत त्याला एसबीआय कडून तीस वर्ष कालावधीसाठी 30 लाख रुपयांपर्यंतचे होम लोन मिळू शकते.

30 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा ईएमआय भरावा लागणार?

समजा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून तुम्हाला 30 वर्ष कालावधीसाठी 30 लाख रुपयांचे होम लोन 8.50% इंटरेस्ट रेट वर मंजूर झाले तर अशा परिस्थितीत तुम्हाला 23 हजार 67 रुपये मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!