पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ पेन्शनधारकांची जूनची पेन्शन येणार नाही

Published on -

सरकार त्यांच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देते. या पेन्शनधारकांनी सरकारीच्या वेळोवेळी येणाऱ्या गाईडलाईन फाँलो करणे आवश्यक असते. आता याच पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या वृद्ध, विधवा आणि विशेष दिव्यांग व्यक्तींना 31 मे 2025 पूर्वी वार्षिक शारीरिक पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही पडताळणी निर्धारित वेळेत केली गेली नाही, तर जून महिन्यापासून पेन्शन थांबवली जाऊ शकते किंवा लाभ नाकारले जाऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे.

किती आहे शेवटची तारीख

पेन्शनधारकांच्या सोयी लक्षात घेऊन सामाजिक न्याय आणि सक्षमिकरण विभागाने वार्षिक भौतिक पडताळणीची अंतिम तारीख 30 एप्रिल वरून 31 मे पर्यंत वाढवली आहे. या संधीमुळे काही कारणास्तव पडताळणी होऊ न शकलेल्या पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे. सर्व लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता लवकरात लवकर पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

कशी करायची पडताळणी?

पेन्शनधारक ई-मित्र कियोस्क, ई-मित्र प्लस सेंटर किंवा ‘राजस्थान सोशल पेन्शन अँड आधार फेसआरडी’ मोबाईल अॅपद्वारे बायोमेट्रिक किंवा फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे त्यांची शारीरिक पडताळणी करू शकतात. खूप वृद्ध किंवा आजारी पेन्शनधारकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये मान्यताप्राप्त अधिकारी त्यांच्या घरी भेट देऊ शकतात आणि मोबाइल अॅपद्वारे पडताळणी करू शकतात. जर फिंगरप्रिंट वापरून बायोमेट्रिक पडताळणीमध्ये समस्या येत असेल, तर आयरिस स्कॅन किंवा ओटीपी आधारित प्रक्रियेद्वारे पडताळणी देखील शक्य आहे. पेन्शनधारक त्यांच्या पीपीओ क्रमांक, आधार कार्ड किंवा जन आधार कार्डसह उपविभाग कार्यालयात जाऊन पडताळणी देखील करू शकतात.

कुठे साधावा संपर्क?

वार्षिक भौतिक पडताळणी दरम्यान कोणतीही तांत्रिक किंवा इतर समस्या उद्भवल्यास, पेन्शनधारक त्यांच्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या विकास अधिकारी, महानगरपालिका आयुक्त किंवा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. प्रत्येक पेन्शनधारकाला सुविधा पुरवणे हे त्यांचे प्राधान्य आहे, असे आश्वासन विभागाने दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe