Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या एकूण 17 गाड्या जानेवारी महिन्यात ठराविक कालावधीसाठी रद्द केल्या जाणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पुणे विभागातील दौंड ते मनमाड रेल्वे मार्गावरील दौंड ते काष्टी या स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दुहेरीकरणाचे काम याच महिन्यात होणार असून या दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाईल. 15 जानेवारीपासून हे काम सुरू होणार असून जवळपास दहा दिवस काम सुरू राहणार आहे. या अनुषंगाने 14 ते 26 जानेवारी 2026 दरम्यान या मार्गावरील बहुतांशी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्यांचे मार्ग सुद्धा चेंज करण्यात आले आहेत. साहजिकच रेल्वे प्रशासनाचा निर्णयाचा 15 जानेवारी नंतर या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. दरम्यान आता आपण या दुहेरीकरणाच्या कामासाठी कोण कोणत्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात येतील याचीच माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
14 ते 25 जानेवारी दरम्यान रद्द केल्या जाणाऱ्या गाड्या
पुणे – सोलापूर एक्सप्रेस (12169/12170)
पुणे – सोलापूर एक्सप्रेस (12157/12158)
पुणे सोलापूर डेमू (11417/11418)
पुणे दौंड डेमू (71401/71402)

23 ते 26 जानेवारी दरम्यान रद्द केल्या जाणाऱ्या गाड्या
या कालावधीत पुणे- नागपूर गरीब रथ एक्सप्रेस रद्द केली जाणार आहे. तसेच पुणे – अमरावती एक्सप्रेस , अजनी – पुणे एक्सप्रेस, निजामाबाद – पुणे एक्सप्रेस, पुणे – नांदेड एक्सप्रेस या गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. यामुळे संबंधित रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना काही काळ फटका बसणार आहे. दरम्यान प्रशासनाच्या माध्यमातून अत्यावश्यक कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला असून या अनुषंगाने प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.













