Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर राज्यातील विविध भागांमध्ये सध्या रेल्वेच्या मोठमोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे कडून नवीन रेल्वे मार्ग सुद्धा विकसित केले जात आहेत. अशातच आता कसारा घाट ते मनमाड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे कडून एक नवीन रेल्वे मार्ग तयार केला जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कसारा घाट ते मनमाड दरम्यान 140 किलोमीटर लांबीचा नवीन समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असून हा रेल्वेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दरम्यान रेल्वेच्या याच महत्त्वकांक्षी प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे.

यामुळे मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणारा प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या रेल्वे मार्गाची लांबी, यावर तयार होणारे स्थानके आणि यासाठी केला जाणारा खर्च याचबाबत आज आपण डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत.
कसा असणार प्रकल्प?
कसारा घाट ते मनमाड दरम्यान 140 किलोमीटर लांबीचा नवीन समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार आहे. या प्रकल्पासाठीच्या खर्चाचा विचार केला असता या प्रकल्पासाठी सुमारे चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे कासारा घाट ते मनमाड दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोघांची बचत होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
या मार्गावरील स्थानकांबाबत बोलायचं झालं तर या मार्गावर न्यू नाशिकरोड, न्यू पाडळी, वैतरणानगर व चिंचलखैरे अशी चार नवीन स्थानके विकसित केली जाणार असून यामुळे या संबंधित भागातील एकात्मिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. दरम्यान, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्यानंतर ही योजना पुढे आली असून, तत्कालीन रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
म्हणून या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू होईल आणि हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. वास्तविक, सध्या इगतपुरी–कसारा दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना बँकर लावावे लागत आहे, आता साहजिकच गाड्यांना बँकर लावले जात असल्याने त्यामुळे त्यांची गती मंदावते. मात्र, नव्या लाईनमुळे हा प्रवास वेगवान होणार आहे. या नव्या मार्गात एकूण 12 बोगदे तयार केले जाणार आहेत.
यामुळे नाशिक–मुंबई लोकल सेवेचाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता या निमित्ताने वर्तवली जाऊ लागली आहे. तथापि आता या योजनेवर रेल्वे मंत्रालय काय निर्णय घेते? ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी राहणार आहे.