रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! आता प्रत्येक ५ वर्षांनी ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करावी लागणार, नाहीतर….

Published on -

Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अत्यल्प भावात म्हणजेच अनुदानित धान्याचा लाभ वितरित करण्यात येतो. याव्यतिरिक्त रेशन कार्ड विविध शासकीय कामांमध्ये उपयोगी पडते.

अनेकदा रेशन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून तसेच रहिवासी पुरावा म्हणून सुद्धा ग्राह्य धरला जातो. विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी रेशन कार्ड आवश्यक असते. अनेक शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये हे कार्ड उपयोगी पडते. मात्र रेशन कार्ड योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुद्धा सुरू आहे.

अनेक लोक अपात्र असताना याचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. मयत लोकांची सुद्धा रेशन कार्ड मध्ये नावे असल्याचे अनेक प्रकरणे बाहेर आले आहेत. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता रेशन कार्ड साठी केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्याचा मोठा निर्णय केंद्रातील सरकारने घेतलेला आहे.

आता केंद्र व राज्य सरकारकडून रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आली असून यासंदर्भात कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार, प्रत्येक रेशन कार्डधारकाला दर ५ वर्षांनी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जर ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर संबंधित लाभार्थ्याला मोफत रेशन मिळणे बंद होऊ शकते आणि रेशन कार्डवरील नावही हटवले जाऊ शकते. विशेष म्हणजे, २०१३ च्या सुमारास ज्या लाभार्थ्यांनी एकदा केवायसी केली होती, त्यांना आता पुन्हा रेशन कार्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे.

सरकारच्या मते, या प्रक्रियेचा उद्देश बनावट लाभार्थी, दुबार नोंदणी आणि अपात्र व्यक्तींची नावे वगळणे हा आहे. दिलासादायक बाब म्हणजे, डिजिटल सुविधांमुळे ई-केवायसी प्रक्रिया आता अतिशय सोपी झाली असून बहुतांश नागरिक घरबसल्या मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

केवायसी करण्याची प्रक्रिया कशी आहे

मोबाईल मध्ये जर केवायसी करायची असेल तर यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहेत. ‘मेरा रेशन’ आणि ‘आधार फेसआरडी’ हे दोन अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर कोणालाही केवायसी प्रक्रिया सहज करता येईल.

मोबाईल मध्ये एप्लीकेशन डाउनलोड झाले की मेरा रेशन हे ॲप उघडा. अ‍ॅप उघडल्यानंतर राज्य व जिल्हा निवडून आधार क्रमांक, कॅप्चा आणि ओटीपी टाकावा लागतो. त्यानंतर स्क्रीनवर आधारशी संबंधित माहिती दिसते. पुढील टप्प्यात फेस ई-केवायसीचा पर्याय निवडून मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्याद्वारे चेहरा स्कॅन करावा लागतो.

ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर ई-केवायसी पूर्ण होते. दरम्यान तुम्ही तुमच्या रेशन कार्ड साठी केवायसी केलेली आहे की नाही याबाबत गोंधळात असाल तर हे तपासण्याची प्रोसेस पण आता सोपी झाली आहे. ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी पुन्हा ‘मेरा रेशन’ किंवा ‘मेरा केवायसी’ अ‍ॅपमध्ये लॉगिन करून स्थिती पाहता येते.

जर स्टेटस ‘Y’ दिसत असेल तर ई-केवायसी पूर्ण झाल्याचे समजावे, तर ‘N’ असल्यास प्रक्रिया अद्याप बाकी आहे. ज्या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने ई-केवायसी करता येत नाही, त्यांनी थेट रेशन दुकानात, सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी.

यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. सरकारने दिलेल्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे, अन्यथा रेशनचा लाभ गमावण्याची वेळ येऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News